शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:57 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीची लगबग सुरू आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे मात्र या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या बैठकीची लगबग सुरू आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक बडे नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या बैठकीला उपस्थित आहेत. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे मात्र या बैठकीला अनुपस्थित आहेत.

आज संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीला अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि संजय सिंह उपस्थित आहेत. मात्र पश्चिम बंगालमध्ये मतदान सुरू असल्याने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहिल्या नाहीत. ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

आज होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्ष ७ टप्प्यांमधील कामगिरीचं परीक्षण केलं जाणार आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि एनडीएला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यामध्ये इंडिया आघाडी यशस्वी ठरेल आणि स्वत: सरकार स्थापन करेल, असा विश्वास इंडिया आघाडीमधील नेत्यांकडून करण्यात येत आहे.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे