शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"पहाडी' मुलीने एक जोरदार कानशिलात लगावली तर..."; कंगना रणौत काँग्रेसवर संतापली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 11:33 IST

Kangana Ranaut, Lok Sabha Election 2024: मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत भाजपाची अधिकृत उमेदवार आहे.

Kangana Ranaut, Lok Sabha Election 2024: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा जागेसाठी मतदानाची तारीख आता जवळ येऊ लागली आहे. त्यामुळे प्रचारालाही धार पाहायला मिळत आहे. भाजपाची अधिकृत उमेदवार अभिनेत्री कंगना रणौतने काँग्रेसचे प्रतिस्पर्धी विक्रमादित्य सिंग यांना 'बिघडलेला राजकुमार' म्हणत चपराक लगावली आहे.  एका सभेत तो म्हणाला, 'विक्रमादित्य, तुला लाज वाटायला हवी. आज तुझे वडील इथे असते तर त्यांनी तुला कानाखाली लगावली असती आणि माफी मागायला सांगितली असती. या पहाडी मुलीने एक चपराक लगावली तर तुला भाज्यांचे रेट विचारायचाही विसर पडेल' असे कंगनाने सुनावले.

"कदाचित त्याच्या आईने त्याला महिलांचा आदर करायला शिकवले नाही. विक्रमादित्य सिंग हे सहा वेळा राज्याचे मुख्यमंत्री असलेले वीरभद्र सिंह आणि मंडीच्या खासदार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांचा मुलगा आहेत. विक्रमादित्य म्हणाले होते की, कंगनाने ज्या-ज्या मंदिरांना भेट दिली आहे, त्या मंदिरांचे शुद्धीकरण करावे लागेल. तसेच हिमाचलच्या मुलींचे रेट काय, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले होते. त्यावर कंगनाने समाचार घेतला.

"विक्रमादित्य माझ्याबद्दल खूप चुकीच्या गोष्टी बोलला. हिमाचलमधील मुलींचे दर काय आहेत, असा सवालही काँग्रेसच्या लोकांनी केला. मी त्यांना सांगून ठेवते की पहाडी मुलींच्या हातात खूप शक्ती आहे. हे जे चंपू आहेत ते समोर दिसले तर पहाडी मुलींची एक चपराक बसेल. मग मुलींचे सोडा, भाज्यांचे भाव विचारायचे विसरतील," असे कंगना ठणकावून सांगितले.

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चारही जागांवर १ जून रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेनंतर रिक्त झालेल्या सहा विधानसभा जागांवरही पोटनिवडणूक होत आहे. कंगना रणौतला लाहौल-स्पितीच्या काझामध्ये स्थानिक लोक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. त्याबाबत भाजपच्या हिमाचल प्रदेश युनिटने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना इतक्या जवळ सभा घेण्याची परवानगी कशी देण्यात आली? अशी तक्रार त्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Kangana Ranautकंगना राणौतmandi-pcमंडीcongressकाँग्रेसBJPभाजपा