शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
4
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
5
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
6
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
7
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
8
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
9
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
10
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
11
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
12
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
13
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
14
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
15
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
16
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
17
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
18
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
19
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
20
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार

भाजपसाठी गुडन्यूज, तर इंडिया आघाडीचे टेंशन वाढणार; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 16:58 IST

Lok Sabha Election 2024: निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबात मोठा दावा केला आहे.

Prashant Kishor on INDIA Alliance: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप '400 पार'चा नारा देत आहेत, तर काँग्रेस भाजपची सत्ता उलथून लावण्याचा दावा करत आहे. या निवडणुकीचा निकाल काय लागेल, हे येत्या 4 जुनला कळेलच. पण, तत्पुर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे.या दाव्यामुळे भाजपवाले नक्कीच खुश होतील. भाजपला दक्षिण आणि पूर्व भारतात मोठा फायदा मिळेल, या भागांत भाजपची व्होट बँक वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.

बंगालमध्येही भाजप नंबर 1 चा पक्ष बनेलपीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, प्रशांत किशोर म्हणाले, विरोधकांना भाजपचा विजयरथ रोखण्याच्या अनेक संधी होत्या, परंतु चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी सर्व संधी गमावल्या. भाजप तेलंगणातील पहिला किंवा दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, ही मोठी गोष्ट आहे. भाजप ओडिशातही जास्तीत जास्त जागा जिंकेल. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप क्रमांक एकचा पक्ष होण्याची दाट शक्यता आहे. तामिळनाडूमध्येही भाजपची मतांची टक्केवारी दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.   

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये लोकसभेच्या एकूण 204 जागा आहेत, परंतु या भागांमध्ये भाजपला 50 जागाही जिंकता आल्या नाहीत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या भागात 29 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 47 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजप 370 जागा जिंकू शकत नाही, त्यांनी फक्त निवडणुकीसाठी एक लक्ष्य ठेवले आहे.

राहुल गांधींवर टीका भाजपने गेल्या काही वर्षांत दक्षिण आणि पूर्व भारतात मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. मोदी आणि अमित शहा यांसारखे भाजप नेते वारंवार या राज्यांना भेट देत आहेत. दुसरीकडे, या राज्यांमध्ये विरोधकांनी फारच कमी प्रयत्न केले. गेल्या पाच वर्षात तमिळनाडूतील निवडणुकांसाठी पंतप्रधानांनी राज्यांना दिलेल्या भेटींची संख्या मोजली तर पंतप्रधानांच्या दौऱ्यासमोर राहुल गांधी किंवा इतर कोणत्याही विरोधी नेत्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त आहेत. राहुल गांधींवर टीका करताना किशोर म्हणाले की, तुमची लढाई उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आहे, पण तुम्ही मणिपूर आणि मेघालयला भेट देत असाल तर तुम्हाला यश कसे मिळेल.

जगन मोहन रेड्डींचे पुनरागमन अवघडलोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. याबाबत प्रशांत किशोर म्हणाले, जगन मोहन रेड्डी यांना पुनरागमन करणे कठीण जाईल. त्यांनी तरुणांना रोजगार देण्यासाठी किंवा राज्याच्या रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी काहीही केले नाही. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनीच जगन मोहन रेड्डी यांच्यासाठी 2014 मध्ये काम केले होते. यानंतर 2019 मध्ये YSRCPने तेलुगु देसम पक्षाचा (टीडीपी) पराभव केला. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस