काँग्रेस जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ पर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:08 IST2024-01-29T12:08:35+5:302024-01-29T12:08:58+5:30
Congress: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध केला जाईल आणि मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अंतिम मसुदा तयार होईल, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले.

काँग्रेस जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ पर्यंत
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा १५ फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध केला जाईल आणि मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अंतिम मसुदा तयार होईल, असे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले.
इंडिया आघाडीमधील पक्षांच्या जाहीरनाम्यांमधून घटक निवडले जातील आणि मुख्य मुद्द्यांची यादी तयार करण्यात येईल. आमच्याकडे आमची अंतर्गत प्रक्रिया आहे. पहिला मसुदा १५ फेब्रुवारीपर्यंत तयार व्हायला हवा, असे ते म्हणाले.
निश्चितपणे, निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करेल तोपर्यंत आमचा जाहीरनामा तयार होईल, असा विश्वास त्यांनी पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय व्यावसायिक काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या ‘शेप द फ्युचर’ या कार्यक्रमात व्यक्त केला.
पक्षाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी नागरी समाजाच्या विविध स्तरावरील रचनात्मक सूचना या कार्यक्रमाद्वारे मागवण्यात आल्या. शशी थरूर पक्षाचा जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत.