शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 15:55 IST

Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत.आज राहुल गांधी बिहार दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Rahul Gandhi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जोरदार प्रचारसभा सुरू आहेत.आज राहुल गांधी बिहार दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.  "नरेंद्र मोदींनी देवाची गोष्ट अशी मांडली आहे की, ४ जूननंतर ईडीने त्यांना प्रश्न विचारले तर ते सांगतील की, मला काहीच माहिती नाही. देवाने मला काम करायला सांगितले होते.'त्यांनी देवाची गोष्ट का आणली हे त्यांनाच माहीत. ४ जूननंतर जेव्हा तेच ईडीचे लोक नरेंद्र मोदींना गौतम अदानीबद्दल विचारतात तेव्हा ते मला माहीत नाही असे म्हणतील, असा टोलाही गांधी यांनी लगावला.

Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान

"तुम्ही लांबलचक भाषणे देणे बंद करा, तुम्ही आधी बिहार आणि देशातील तरुणांना सांगा की तुम्ही किती लोकांना रोजगार दिला. देशाचे तुकडे करण्यापेक्षा तरुणांना रोजगार न दिल्याबद्दल उत्तर द्या, पूर्वी तुमच्यासाठी वेगवेगळे मार्ग होते. तुम्ही सैन्य, सरकारी नोकरी किंवा खासगी क्षेत्रात जाऊ शकता. पण त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या. यानंतर अग्निवीरने सैन्यात भरतीची योजना आणली आणि देशाच्या सैनिकांना मजूर बनवले, अशी टीकाही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार राजे युग आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना एससी, एसटी आणि ओबीसींचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत. नरेंद्र मोदींनी २२ ते २५ महाराज केले आहेत. त्यांची नवीन नावे आहेत. त्यांची नावे अदानी आणि अंबानी आहेत. नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी काम करतात. या लोकांचे १६ लाख कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला. 

या सभेत राहुल गांधी यांनी तीन मोठी आश्वासनेही दिली. जर इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर सैन्य भरतीसाठी अग्निपथ योजना रद्द केली जाईल. याशिवाय सर्व महिलांना दरमहा ८५०० रुपये दिले जाणार आहेत. आमचे सरकार आल्यास जे उद्योग बंद पडले आहेत ते सर्व सुरू करू, असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४