शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने कधीही न गमावलेल्या या ६ जागांवर काँग्रेसची नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:43 IST

Lok Sabha Election 2024: छत्तीसगडमधील लोकसभेच्या एकूण ११ पैकी ६ जागा ज्या भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले आहेत जिथे वर्ष २००० मध्ये राज्याच्या स्थापनेपासून कधीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही, या जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

रायपूर - छत्तीसगडमधील लोकसभेच्या एकूण ११ पैकी ६ जागा ज्या भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले आहेत जिथे वर्ष २००० मध्ये राज्याच्या स्थापनेपासून कधीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही, या जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे राज्यात सत्ताधारी भाजपला या जागा कायम ठेवत राज्यातील इतर जागा जिंकण्याची आशा आहे. 

या ६ जागांत कांकेर, सुरगुजा, रायगड, जांजगीर-चांपा, रायपूर आणि बिलासपूर या जागांचा समावेश आहे. भाजपचे राज्यातील सहा लोकसभा बालेकिल्ले जिंकण्यासाठी काँग्रेसने एक विद्यमान आमदार, एका मंत्र्यासह दोन माजी आमदार, दोन नवे चेहरे आणि एक अनुभवी नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. 

रायपूर : या मतदारसंघात भाजपने विद्यमान राज्य सरकारमधील मंत्री आणि आठ टर्म आमदार असलेले ब्रिजमोहन अग्रवाल यांना तर, काँग्रेसने माजी आमदार विकास उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. - कांकेर : कांकेर लोकसभा मतदारसंघातही भाजपने विद्यमान खासदार मोहन मांडवी यांना तिकीट नाकारुन माजी आमदार भोजराज नाग यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने पंचायत संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे बिरेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. - जांजगीर-चांपा : भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार गुहाराम अजगले यांचे तिकीट कापून महिला नेत्या कमलेश जांगडे या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने माजी राज्यमंत्री शिवकुमार दहरिया यांना तिकीट दिले. - रायगड : मुख्यमंत्री विष्णू देव साय यांचा गृह जिल्हा आहे. यावेळी भाजपने राधेश्याम राठिया या नव्या चेहऱ्याला तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने राज्यातील सारंगगड राजघराण्यातील मेनका देवी सिंह यांच्यावर आशा पल्लवित केल्या आहेत.- सुरगुजा : येथे भाजपने प्रत्येक निवडणुकीत उमेदवार बदलला आहे. यावेळीही रेणुका सिंह यांच्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी आमदार चिंतामणी महाराज यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी राज्यमंत्री तुलेश्वर सिंह यांच्या कन्या शशी सिंह यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. - बिलासपूर : बिलासपूर मतदारसंघात भाजपचे माजी आमदार टोखान साहू आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार देवेंद्र यादव यांच्यात लढत होणार आहे.

टॅग्स :chhattisgarh lok sabha election 2024छत्तीसगड लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४