शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसलाच नकोय देशाची राज्यघटना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 10:04 IST

येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसला मुस्लीम समुदायाला आरक्षण द्यायचे आहे, कारण पक्षाची ती आवडती व्होट बँक आहे.

आनंद (गुजरात) :काँग्रेस अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, ओबीसींचे आरक्षण मुस्लीम समुदायाला देण्यासाठी भारताची घटना बदलू इच्छिते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केला.

येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसला मुस्लीम समुदायाला आरक्षण द्यायचे आहे, कारण पक्षाची ती आवडती व्होट बँक आहे. त्यासाठी त्यांना राज्यघटना बदलायची आहे. मी काँग्रेसला आव्हान देतो की, मुस्लीम समुदायाला धार्मिक आधारावर आरक्षण देण्यासाठी ते राज्यघटना बदलणार नाहीत, असे त्यांनी लेखी द्यावे. राज्यघटनेची प्रत डोक्यावर घेऊन नाचण्यात काही अर्थ नाही. राज्यघटनेसाठी जगायचे आणि मरायचे हे शिकायचे असेल तर मोदींकडे या. विरोधी पक्षनेते सलमान खुर्शीद यांची भाची मारिया आलम यांच्या ‘व्होट जिहाद’च्या आवाहनावरही मोदींनी टीका केली.  ‘आता, इंडिया आघाडी ‘व्होट जिहाद’ पुकारते आहे. हे नवीन आहे, कारण आम्ही आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ बद्दल ऐकले आहे. हे एका सुशिक्षित मुस्लीम कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितले आहे, ज्याने मदरशात शिक्षण घेतलेले नाही. एकाही काँग्रेस नेत्याने त्याचा निषेध केला नाही’, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न

मोदी यांनी सुरेंद्रनगर येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भगवान राम आणि भगवान शिव यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. विरोधी पक्ष हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे माेदी म्हणाले. ही निवडणूक मोदींच्या मिशनसाठी आहे, महत्त्वाकांक्षेसाठी नाही ‘सध्याच्या लोकसभा निवडणुका मोदींच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नसून  ध्येय पूर्ण करण्यासाठी आहेत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुनागढ येथील प्रचारसभेत सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस