शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

भ्रष्टाचाऱ्यांचा कारवाई रोखण्यासाठी प्रचार, नरेंद्र मोदी यांचा विरोधकांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 11:11 IST

Lok Sabha Election 2024: विरोधी पक्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावरील हल्ला अधिक तीव्र होईल, असे निक्षून सांगितले.

रुद्रपूर (उत्तराखंड) : विरोधी पक्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावरील हल्ला अधिक तीव्र होईल, असे निक्षून सांगितले. देशात प्रथमच भ्रष्टाचारी नेते एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई रोखण्यासाठी प्रचार करत आहेत, अशी टीका त्यांनी  जाहीरसभेत केली.

उत्तराखंडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना येथील ‘विजय शंखनाद’ जाहीरसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, ‘तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला जाईल, याची गॅरंटी देण्यासाठी मी येथे आलो आहे. भ्रष्टाचार गरिबांचे, मध्यमवर्गीयांचे हक्क हिरावून घेतो आणि मी ते हिरावू देणार नाही.’

मोदी म्हणाले...- भाजप ‘राष्ट्र प्रथम’ची शपथ घेतो, तर काँग्रेस पक्ष देशाला लुटण्याची संधी शोधत आहे. काँग्रेसच्या काळात भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, आज तो शस्त्र निर्यात करणारा देश आहे.

निवडणूक भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी- राजस्थानमधील कोटपुतली येथील जाहीरसभेत मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई थांबवण्यासाठी पहिल्यांदाच सर्व भ्रष्टाचारी एकत्र येऊन लोकसभेचा प्रचार करत आहेत.- ही निवडणूक भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केलेला संकल्प आहे.

सत्तेबाहेर राहताच आग लावण्याची भाषाविरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसच्या राजघराण्यातील राजपुत्राने देशात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार निवडून आल्यास आगडोंब उसळेल, असा इशारा दिला आहे. ज्यांनी ६० वर्षे देशावर राज्य केले ते १० वर्षे सत्तेबाहेर राहताच देशाला आग लावण्याची भाषा करत आहेत. आणीबाणीच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि त्यामुळे ते लोकांना भडकवण्यात व्यस्त आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttarakhand Lok Sabha Election 2024उत्तराखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४