शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

गांधीनगरमधून अमित शाह यांचा 7 लाखहून अधिक मतांनी बंपर विजय, तर वाराणसीतून PM मोदींची विजयी हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 19:53 IST

Lok Sabha Election 2024 : गांधीनगर येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. 

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होत आहेत. हे निकाल भाजप अथवा एनडीएच्या अपेक्षेप्रमाणे नसले तरी, गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघात अमित शाह यांनी कमाल केली आहे. येथून अमित शाह तब्बल ७,४४,७१६ मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे या विजयासह त्यांनी स्वतःच स्वतःच्या विजयाचा विक्रम मोडला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांनी 5 लाख मतांनी विजय नोंदवला होता. यापूर्वी गांधीनगरमधून आडवाणी यांनी 4.83 लाख मतांनी विजय मिळवला होता. तसेच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. 

अमित शाह यांना किती मते मिळाली? -गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघ हा गेल्या 35 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. अमित शह यांच्याआधी ही जागा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे होती. ही जागा भाजपची अत्यंत सुरक्षित जागा मानली जाते. अडवाणींनी या जागेवरून तब्बल ६ वेळा निवडून आले आहेत. तर अमित शाह 2019 पासून या जागेवरून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी गांधीनगरमधून दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अमित शाह यांना एकूण 1010972 मते मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सोनल पटेल यांचा पराभव केला. त्यांना केवळ २६६२५६ मते मिळाली.

पंतप्रधा मोदींची हॅटट्रिकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा पराभव केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 6 लाख 12 हजार 970 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना 4 लाख 60 हजार 457 मते मिळाली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीमधून 1 लाख 52 हजार 513 मतांनी विजय नोंदवला आहे. 

मोदींचा अनोखा विक्रम -यापूर्वी, मोदी 2014 आणि 2019 मध्येही वाराणसीतून विजयी होत लोकसभेत पोहोचले होते. याच बरोबर, ते एकाच जागेवरून सलग तिसऱ्यांदा विजयी होणारे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावर होता. नेहरू फूलपूर लोकसभा मतदारसंघातून तीनवेळा खासदार झाले होते. तर अटल बिहारी वाजपैयी हे लखनौ लोकसभा मतदारसंघातून पाचवेळा विजयी झाले होते.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहVaranasiवाराणसी