शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

Lok Sabha Election 2019 : आणि रेहान वाड्रा याची पहिल्यांदा मतदान करण्याची संधी हुकली...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 10:43 AM

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता. 

ठळक मुद्देयूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता.  पत्रकारांनी रविवारी यासंदर्भात प्रियंका गांधी यांना रेहानने मतदान का केले नाही असा प्रश्न विचारला. त्यावर 'रेहानची परीक्षा सुरू असून त्यासाठी तो लंडनला गेला आहे' असं उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं.'

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्या मनेका गांधी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंदिया, शीला दीक्षित, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव अशा अनेक बड्या उमेदवारांचे भवितव्य लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात झालेल्या मतदानात रविवारी (13 मे) ईव्हीएमबंद झाले. सात राज्यांत 59 लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी 63.3 टक्के इतके मतदान झाले.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा  (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता. 

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांच्यासह त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया उपस्थित होते. तसेच यावर्षी रेहान पहिल्यांदाच मतदान करणार होता. मात्र त्याने मतदान केले नाही. पत्रकारांनी रविवारी यासंदर्भात प्रियंका गांधी यांना रेहानने मतदान का केले नाही असा प्रश्न विचारला. त्यावर 'रेहानची परीक्षा सुरू असून त्यासाठी तो लंडनला गेला आहे' असं उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं.' परीक्षेमुळे मतदान करता आलं नसल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. 

सध्या सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी रविवारी दिली. प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील लोढी इस्टेट येथील सरदार पटेल विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ''यंदाची लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि देशाला वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मतदान करताना ही बाब लक्षात ठेवा.  या निवडणुकीदम्यान देशातील जनतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसत होता. त्यामुळे भाजपाचा पराभव होणार हे स्पष्ट आहे.'' असे प्रियंका गांधी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिलेल्या आश्वासनांबाबत काहीच बोलत नाही. दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन याबाबत बोलण्याऐवजी नरेंद्र मोदी हे वायफळ विषयांवर बोलत आहेत. असा टोलाही प्रियंका गांधी यांनी यावेळी लगावला. 

सहाव्या टप्प्याला हिंसाचाराचे गालबोट; देशात 63% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के

सात राज्यांत 59 लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी 63.3 टक्के इतके मतदान झाले. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व भाजपामधील कडव्या संघर्षामुळे गाजत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.13 टक्के मतदान झाले. परंतु या राज्यात तुरळक हिंसाचाराचे गालबोट लागले. पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्यावर ताफ्यावर हल्ला झाला. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. या घटनेत घोष यांचा एक अंगरक्षक जखमी झाला व ताफ्यातील एका वाहनाची नासधूस झाली आहे. यावेळी घोष यांच्याबरोबर असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात तृणमूल काँग्रेसचा एक जण जखमी झाला आहे. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपा आणि आरएसएसचे कार्यकर्ते सुरक्षा दलांच्या वेशात येत आहेत, असा आरोप केला.बिहारमधील शेओहर लोकसभा मतदारसंघात होमगार्डच्या बंदूकीतून चुकून उडालेली गोळी लागून एक निवडणूक कर्मचारी ठार झाला. बिहारच्या पश्चिम चंपारण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय जयस्वाल यांनाही काही जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचे समजते. हरयाणामध्ये जिंद जिल्ह्यात तीन बूथवरील ईव्हीएम यंत्रांवर आपले निवडणूक चिन्ह नीट दिसत नसल्याची तक्रार जननायक जनता पार्टीचे उमेदवार दिग्विजय चौटाला यांनी केली. अन्य राज्यांतही काही ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आहेत. या 59 मतदारसंघातील सर्वाधिक 43 जागा भाजपाकडे होत्या. या जागा राखणे हे भाजपापुढे मोठे आव्हान असणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस