शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 18:48 IST

सर्वांना त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवण्याचं आवाहन

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीट्विटरवर त्यांच्या नावापुढे असणारा चौकीदार शब्द हटवला आहे. संध्याकाळी सहानंतर मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील चौकीदार शब्द हटवला. आता चौकीदार स्पिरीट नव्या पातळीवर न्यायची वेळ आली असल्याचं ट्विट मोदींनी केलं आहे. मोदींनी त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवल्यानं आता भाजपाचे इतर नेते आणि मंत्रीदेखील त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवण्याची शक्यता आहे. 'चौकीदाराचं स्पिरीट प्रत्येक क्षणी जिवंत ठेऊया आणि भारताच्या विकासासाठी काम करूया. माझ्या ट्विटर अकाऊटंवरुन चौकीदार शब्द हटवतोय. पण तो माझा अभिन्न हिस्सा राहील. तुम्ही सर्वांनीदेखील असंच करावं अशी विनंती करतो,' असं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी दुसऱ्या एका ट्विटमधून देशातील जनतेचं कौतुक केलं. 'जनता चौकीदार झाली आणि त्यांनी देशाची सेवा केली. जातीयवाद, भ्रष्टाचार, भांडवलवाद यांच्यासारख्या राक्षसांपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी चौकीदार शब्द अतिशय सामर्थ्यशाली ठरला,' असं मोदींनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं. त्याआधी मोदींनी शानदार विजयाबद्दल जनतेचे आभार मानले. 'भारताचे धन्यवाद! आमच्या आघाडीवर जनतेनं व्यक्त केलेला विश्वास आम्हाला लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करण्याची शक्ती देतो,' अशा शब्दांत मोदींनी जनतेला धन्यवाद दिले. या ट्विटमधून त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. 'भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सरकारचा विकासाचा अजेंडा तळागाळापर्यंत नेण्यासाठी ते लोकांच्या घरोघरी गेले,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटरBJPभाजपा