हिंसा झालेल्या ठिकाणी पुन्हा मतदान घ्या : पियुष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:11 PM2019-05-20T15:11:43+5:302019-05-20T15:23:51+5:30

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे पियुष गोयल म्हणाले.

lok sabha election 2019 Piyush Goyal demand Vote again | हिंसा झालेल्या ठिकाणी पुन्हा मतदान घ्या : पियुष गोयल

हिंसा झालेल्या ठिकाणी पुन्हा मतदान घ्या : पियुष गोयल

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यात घेण्यात आलेले मतदान १९ रोजी संपले. मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. याविषयी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली आहे. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाण प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे पियुष गोयल म्हणाले.

 

 

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी किरकोळ हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात मात्र हे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळाले. कल तनरतारन येथे झालेल्या चकमकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकजण जखमी झाले होते. हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना पश्चिम बंगाल मध्ये पहायला मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या प्रत्येक मतदानाच्या टप्प्यात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना समोर आल्या होत्या. पियुष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे,  हिंसा झालेल्या बूथ वर पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी केली असल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

quote class="twitter-tweet" data-lang="en">

Piyush Goyal, BJP after meeting with EC: We gave the Election Commission detailed information of the violence inflicted upon our workers. We reiterated our demand for re-poll for constituencies where violence occurred in 7th phase and earlier phases, particularly in West Bengal. pic.twitter.com/gyS3WTmLyb

— ANI (@ANI) May 20, 2019


 

सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी केली होती.

 

 

 

 

 

 

 

 

Web Title: lok sabha election 2019 Piyush Goyal demand Vote again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.