Lok Sabha Election Voting Live : सातव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.03 टक्के मतदान

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 07:09 AM2019-05-19T07:09:58+5:302019-05-19T17:24:52+5:30

सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी रविवारी (19 मे)मतदान होत आहे.

lok sabha election 2019 phase 7 live voting news and updates marathi | Lok Sabha Election Voting Live : सातव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.03 टक्के मतदान

Lok Sabha Election Voting Live : सातव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.03 टक्के मतदान

Next

नवी दिल्ली : सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी रविवारी (19 मे)मतदान होत आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. 918 उमेदवार त्यासाठी रिंगणात असून सुमारे 10 कोटी मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्येही मतदान होत आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय आणि सप-बसप आघाडीच्या शालिनी यादव यांनी आव्हान दिले आहे.

LIVE

Get Latest Updates

06:06 PM

हिमाचल प्रदेशमधल्या सोलनच्या मॉडल पोलिंग स्टेशनवर बूथ क्रमांक 76वर विद्यार्थ्यांनी बँडसह मतदारांचं केलं स्वागत



 

06:04 PM

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी कुटुंबीयांसह केलं मतदान



 

06:03 PM

542 लोकसभा जागांवरचं मतदान संपन्न- निवडणूक आयोग



 

05:58 PM

नवी दिल्लीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी घेतली सोनिया गांधींची भेट



 

05:26 PM

सातव्या टप्प्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.03 मतदान, बिहार 46.75%, हिमाचल प्रदेश 57.43%, मध्य प्रदेश 59.75%, पंजाब 50.49%, उत्तर प्रदेश 47.21%, पश्चिम बंगाल 64.87%, झारखंड 66.64% आणि चंडीगडमध्ये 51.18% मतदान झालं.  



 

05:02 PM

सीपीआय(एम)चे महासचिव सीताराम येच्युरींनी टीएमसीवर डायमंड हार्बर, दम दम आणि उत्तर कोलकात्यात तोडफोड केल्याचा आरोप



 

05:00 PM

स्वतंत्र भारतातील पहिला मतदार श्या सरन नेगी यांनी किन्नूरमध्ये केलं मतदान, अधिकाऱ्यांनी केलं पारंपरिक लोकसंगीतानं स्वागत



 

04:59 PM

बिहारमधल्या आरा पोलिंग बुथ 49वर बोगस मतदान रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला



 

04:16 PM

हिमाचल प्रदेशमध्ये नवरदेवानं बजावला मतदानाचा हक्क

 



 

04:14 PM

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं कोलकात्यात बजावला मतदानाचा अधिकार



 

04:01 PM

मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यातील भील आदिवासी मोठ्या संख्येनं मतदानासाठी पडले बाहेर, आमच्यासाटी रस्ता, पाणी, रोजगारांचे अनेक प्रश्न आहेत. नवं सरकार येण्यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहोत.



 

03:53 PM

सातव्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 51.95 टक्के मतदान, बिहार 46.66%, हिमाचल प्रदेश 49.43%, मध्य प्रदेश 57.27%, पंजाब 48.18%, उत्तर प्रदेश 46.07%, पश्चिम बंगाल 63.58%, झारखंड 64.81% आणि चंडीगडमध्ये 50.24% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क



 

03:50 PM

बठिंडातल्या तलवंडीतल्या बूथ क्रमांक 122वर हिंसा, एक व्यक्ती जखमी



 

03:35 PM

हिमाचल प्रदेशमधल्या लाहुल स्पीतीतील जगातील सर्वात उंच पोलिंग बूथवर झालं मतदान



 

03:32 PM

पाटण्यातील सरकुना गावातील बूथ क्रमांक 101 आणि 102वर झालेल्या दोन गटांच्या वादानंतर मतदान रोखलं



 

03:16 PM

पाटण्यात जुळ्या बहिणींनी दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपात केलं मतदान



 

03:14 PM

बशीरहाटमध्ये मतदान केल्यानंतर नुसरत जहाँ गीत यांनी केलं लोकांना अभिवादन



 

02:50 PM

मध्य प्रदेशात 37 अंध महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क



 

02:48 PM

मध्य प्रदेशात लग्नानंतर वधू-वराने कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क



 

02:46 PM

टीएमसीचे नेते मदन मित्रा यांचा मतदान केंद्रावर सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत वाद



 

02:25 PM

गळ्यात नोटांचा हार घालून नवरदेव पोहचला मतदानाला!



 

02:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेसचे अजय राय यांनी आव्हान दिले आहे.



 

01:46 PM

1 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी



 

01:41 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

01:34 PM

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

01:31 PM

माझ्या अंगरक्षकाने काहीही केलेलं नाही, उलट कॅमेरामननेच माझ्या गाडीचं नुकसान केलं - तेजप्रताप यादव



 

01:27 PM

तेजप्रताप यादव यांच्या गाडीवर हल्ला; संतप्त कॅमेरामॅनने गाडीची काच फोडली



 

01:25 PM

शत्रुघ्न सिन्हा यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

12:55 PM

120 वर्षीय आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क



 

12:51 PM

नवरदेवाने केलं मतदान



 

12:45 PM

केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

12:38 PM

आरपीएन सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

12:30 PM

नवज्योतसिंग सिद्धू यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क



 

12:21 PM

बिहारच्या नालंदातील चांदोरा गावात मतदारांचा मतदानावर बहिष्कार



 

11:59 AM

पश्चिम बंगालमध्ये मतदारांची केंद्राबाहेर निदर्शनं

11:38 AM

बसीरहाट येथील निदर्शनानंतर सुरक्षा व्यवस्था कायम



 

11:18 AM

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

11:18 AM

मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.



 

11:18 AM

भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्का



 

11:15 AM

पश्चिम बंगालमध्ये मतदारांची केंद्राबाहेर निदर्शनं, बसीरहाट येथील मतदान केंद्रांवर तृणमूलचे कार्यकर्ते मतदान करण्यापासून रोखत असल्याचा आरोप.



 

10:49 AM

भाजपाचे नेते अनुराग ठाकूर मतदानासाठी रांगेत



 

10:40 AM

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

10:31 AM

मोहम्मद सलीम यांनी केलं मतदान



 

10:19 AM

103 वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क



 

10:08 AM

अबकी बार भाजपा 300 तर एनडीए 400 पार - योगी आदित्यनाथ



 

10:04 AM

बिहार : साध्वीचं वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे, पण आपण अशा तऱ्हेची वक्तव्ये सहन करू शकत नाही - नितीश कुमार



 

09:58 AM

काँग्रेसच्या पवनकुमार बन्सल यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

09:53 AM

मध्य प्रदेशमध्ये 9 वाजेपर्यंत 7.16% मतदान



 

09:42 AM

9 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी



 

09:32 AM

भाजपा नेते कैलाश विजयवर्गीय यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

09:04 AM

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

08:33 AM

ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

08:09 AM

सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी मतदान



 

08:07 AM

क्रिकेटपटू हरभजन सिंग मतदानासाठी रांगेत



 

07:51 AM

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी केले मतदान



 

07:51 AM

बिहारच्या पाटणा साहिब येथे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड



 

07:45 AM

उत्तर प्रदेश : चंदौली येथील तारा जीवनपूर गावातल्या काही मतदारांनी जबरदस्तीने हाताला शाई लावल्याचा आरोप केला आहे.



 

07:28 AM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

07:19 AM

गोरखपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

07:15 AM

सातव्या टप्प्यामध्ये बिहार (8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (3), मध्य प्रदेश (8), पंजाब (13), उत्तर प्रदेश (13), पश्चिम बंगाल (9) या राज्यांसह चंदीगड (1) या केंद्रशासित प्रदेशामध्ये मतदान



 

07:14 AM

पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघामधून भाजपाने अभिनेते सनी देओल यांना उमेदवारी दिली आहे.



 

07:13 AM

झारखंड (3)



 

07:13 AM

पश्चिम बंगाल (9)



 

07:12 AM

सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदान



 

Web Title: lok sabha election 2019 phase 7 live voting news and updates marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.