उज्जैनः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी माझ्या वडिलांचा सातत्यानं अपमान करतात, आजी आणि पणजोबांबद्दल वाईट बोलतात. परंतु तरीही मी त्यांच्या कुटुंबीयांचा कधीही अपमान करणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकांचा हवाला देत राहुल गांधींनी सांगितलं की, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आम्ही त्यांचा पराभव केला. लोकसभा निवडणूकही तशाच प्रकारे प्रेमानं जिंकणार आहोत.उज्जैनमधल्या लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस उमेदवार बाबुलाल मालवीय आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही. भारतातील सर्वच लोक आमचे आहेत. मोदी नेहमीच द्वेषानं बोलतात. माझ्या वडिलांचा अपमान करतात. आजी आणि पणजोबांबद्दल वाईट वाईट बोलतात.
...तरीही मी मोदींच्या कुटुंबीयांचा कधीही अपमान करणार नाही- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 21:34 IST