Lok Sabha Election 2019 Live Voting Updates and Latest News in Marathi, Polling in 59 constituencies in 7 states today | Lok Sabha Election Voting : सात राज्यातील 59 मतदारसंघात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 61.14% मतदान
Lok Sabha Election Voting : सात राज्यातील 59 मतदारसंघात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 61.14% मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मतदानाची ही सहावी फेरी असून बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा सात राज्यांचा समावेश आहे. त्यामध्ये 979 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत.

या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, राधा मोहन सिंह, हर्षवर्धन, कृष्णपाल गुर्जर, राव इंदरजित सिंह, नरेंद्र सिंह तोमर, तसेच गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, निरहुआ, मनोज तिवारी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, कीर्ती आझाद, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, भूपिंदरसिंह हुडा व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे.

LIVE

Get Latest Updates

07:23 PM

संध्याकाळी 7 पर्यंत झालेलं मतदान- पश्चिम बंगाल 80.16%, दिल्ली- 56.11%, हरयाणा- 62.91%, उत्तर प्रदेश 53.37%, बिहार- 59.29%, झारखंड- 64.46%, मध्य प्रदेश- 60.40%

07:21 PM

संध्याकाळी सातपर्यंत 61.14% मतदान
 

06:09 PM

संध्याकाळी 6 पर्यंत झालेलं मतदान- पश्चिम बंगाल 80.13%, दिल्ली- 55.44%, हरयाणा- 62.14%, उत्तर प्रदेश 50.82%, बिहार- 55.04%, झारखंड- 64.46%, मध्य प्रदेश- 60.12%

04:49 PM

दुपारी 4 वाजेपर्यंत झालेलं मतदान- पश्चिम बंगाल 70.51%, दिल्ली- 45.24%, हरयाणा- 51.86%, उत्तर प्रदेश 43.26%, बिहार- 44.40%, झारखंड- 58.08%, मध्य प्रदेश- 52.78%

04:47 PM

59 मतदारसंघात 4 वाजेपर्यंत सुमारे 50.77% मतदान

03:06 PM

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्लीतील कामराज लेन येथील मतदान केंद्रात बजावला मतदानाचा हक्क 

02:48 PM

दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून बोगस मतदानाचा प्रयत्न झाल्याचा आप उमेदवाराचा आरोप 

01:48 PM

नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बजावला मतदानाचा हक्क 

12:32 PM

दुपारी बारा वाजेपर्यंत सात राज्यातील 59 मतदारसंघात 25.13 टक्के मतदान 

12:06 PM

111 वर्षीय बचन सिंह यांनी दिल्लीत बजावला मतदानाचा हक्क 

11:50 AM

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी लोढी इस्टेट इथे बजावला मतदानाचा हक्क 

11:40 AM

पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे भाजपा आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी 

11:36 AM

सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील निर्माण भवन येथे बजावला मतदानाचा हक्क 

11:16 AM

हरियाणाचे मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क 

10:55 AM

सहाव्या टप्प्यातील मतदानादरम्यान बंगालमध्ये हिंसाचार, भाजपा उमेदवार भारती घोष यांच्या वाहनाची तोडफोड 

10:50 AM

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्लीतील औरंगजेब लेन येथे केले मतदान 

10:44 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बजावला मताधिकार 

10:18 AM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बजावला मताधिकार 

10:12 AM

दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातील आप उमेदवार आतिशी यांनी बजावला मताधिकार 

10:04 AM

भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी बजावला मताधिकार 

09:31 AM

सहाव्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत झारखंडमध्ये सर्वाधिक 12.45 टक्के मतदान 

09:21 AM

नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीश सिसोदिया यांनी केले मतदान 

09:14 AM

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे बजावला मताधिकार 

08:52 AM

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शीला दीक्षित यांनी बजावला मताधिका 

07:56 AM

माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार गौतम गंभीरने बजावला मताधिकार 

07:54 AM

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केले मतदान

विराटने हरियाणातील गुरुग्राम येथे बजावला मतदानाचा हक्क  

07:35 AM

भोपाळ येथील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क 

07:35 AM

दिल्लीत मतदानासाठी मतदारांच उत्साह, अनेक मतदान केंद्रासमोर लागल्या रांगा

  

07:15 AM

मतदान करा; पंतप्रधान मोदींचे मतदारांना आवाहन

नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

07:08 AM

या सात राज्यांमधील 59 मतदारसंघामध्ये आज मतदान

बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा सात राज्यांमधील 59 मतदारसंघातील नागरिक आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावतील.

07:06 AM

सात राज्यांतील ५९ जागांसाठी आज मतदान 


Web Title: Lok Sabha Election 2019 Live Voting Updates and Latest News in Marathi, Polling in 59 constituencies in 7 states today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.