मंचरला दूरध्वनी सेवेचा बोजवारा
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:04+5:302015-03-20T22:40:04+5:30
सेवा सुरळीत करण्याची मागणी : आंदोलनाचा इशारा

मंचरला दूरध्वनी सेवेचा बोजवारा
स वा सुरळीत करण्याची मागणी : आंदोलनाचा इशारामंचर : येथील टेलिफोन मंचर विभागीय कार्यालयाकडून व्यवस्थित सेवा मिळत नाही. बीएसएनएलच्या गलथान कारभारामुळे व्यापारी, वित्तीय संस्था, शासकीय कार्यालये व विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. बीएसएनएलने कामकाजात सुधारणा करावी अन्यथा मंचर कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँगे्रसचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत धायबर यांनी दिला आहे.सूर्यकांत धायबर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने बीएसएनएलला निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे, की आंबेगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बीएसएनएलची सेवा सातत्याने विस्कळीत झाली आहे. दूरध्वनी सेवेबरोबरच इंटरनेट सेवाही सातत्याने बंद असल्याने ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. तालुक्यात पूर्वी बीएसएनएलच्या दूरध्वनी कनेक्शनधारकांची संख्या चार हजारांच्याही पुढे होती. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे ही संख्या झपाट्याने कमी झाली असून, ती हजार-बाराशेवर आली आहे. यासाठी मंचर कार्यालयाचे अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. या भोंगळ कारभाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आदिवासी भागातील बीएसएनएलचे मनोरे वारंवार बंद पडतात, तीच परिस्थिती पूर्व भागात आहे. दूरध्वनी जोड बंद पडल्यास अनेकदा तक्रार करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याचा आरोप सूर्यकंात धायबर यांनी केला आहे. मंचर हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असून, अनेक शासकीय कार्यालये वित्तीय संस्था, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, शैक्षणिक संस्था यांची कार्यालये येथे कार्यरत आहेत. या कार्यालयांमध्ये मुख्यत्वे दूरध्वनी हेच संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट सुविधा ही अत्यंत गरजेची बाब आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दूरध्वनी सेवेबरोबरच इंटरनेट सेवाही सातत्याने खंडित होत असल्याने या कार्यालयांना मोठा फटका बसत आहे. ही सेवा त्वरित सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सूर्यकांत धायबर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात, राजेंद्र थोरात, जगदीश घिसे, लक्ष्मण थोरात, संजय बाणखेले, राहुल पडवळ, प्रवीण मोरडे, बाजीराव मोरडे, विकास खानदेशे, राहुल थोरात यांच्या निवेदनावर सा आहेत.