शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेतकरी आंदोलनाने उडवली भाजपाची दाणादाण, काँग्रेसचा निर्विवाद विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 12:20 IST

Rajasthan Sriganganagar Panchayati Raj Election Result: राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत BJPचा दारुण पराभव झाला आहे. येथील जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत Congressने मुसंडी मारली आहे.

जयपूर -  राजस्थानमध्ये शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव झाला आहे. येथील जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. भाजपाविरोधात मतदारांमध्ये नाराजी एवढी तीव्र होती की रायसिंहनगर पंचायत समितीमध्ये भाजपाला खातेही उघडत आले नाही.

श्रीगंगानगर जिल्ह्यातील पंचायत राज संस्थांचे मंगळवारी लागलेले निकाल पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने लागले. येथील जिल्हा परिषदेच्या ३१ मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने २५ ठिकाणी विजय मिळवला. तर पंचायत समित्यांच्या १६९ वॉर्डपैकी ११० वॉर्डमध्ये विजय मिळवला. जिल्ह्यातील ९ पैकी आठ पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसने निर्विवाद विजय मिळवला. या निकालांमधून मतदार हा भाजपावर किती नाराज आहे हे दिसून आले. तसेच या निकालांमुळे भाजपा नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.

श्रीगंगानगरमध्ये मतदान झालेल्या नऊपैकी आठ पंचायत समित्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व राहिले. त्यामध्ये श्रीगंगानगर, रायसिंहनगर, पदमपूर, सूरतगड, घडसाना, अनूपगड, श्रीविजयनगर आणि श्रीकरणपूर येथे काँग्रेसचा प्रमुख बसेल हे निश्चित झाले आहे. तर सादुलशहर येथेही अपक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे.

पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपाला केवळ २८ जागा मिळाल्या. तर उर्वरित १८ जागांवर १८ अपक्ष आणि १२ जागांवर माकपा व एका जागेवर राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने विजय मिळवला आहे. रायसिंहनगरमध्ये तर भाजपाचे खातेही उघडले नाही. तर श्रीगंगानगर जिल्हा परिषदेच्या ३१ पैकी केवळ ३ जागांवर भाजपाला विजय मिळाला. तर २ ठिकाणी माकपा आणि एका ठिकाणी अपक्षाने विजय मिळवला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान