छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 06:33 IST2025-06-08T06:33:27+5:302025-06-08T06:33:54+5:30

Narendra Modi News: भाजपप्रणीत एनडीएच्या केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे शेतीक्षेत्रात चांगले परिवर्तन घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. 

Loans should be taken first for small needs, good changes have taken place in the agricultural sector, says Prime Minister Narendra Modi | छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी

 नवी दिल्ली - भाजपप्रणीत एनडीएच्या केंद्र सरकारच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे शेतीक्षेत्रात चांगले परिवर्तन घडले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

ते म्हणाले की, शेतकऱ्यांची सेवा करण्यात आमच्या सरकारला आनंद वाटतो. जलसिंचन, शेतीच्या अन्य मुद्द्यांवर सरकारने लक्ष केंद्रित केले असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. भविष्यातही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणखी योजना राबविल्या जातील. त्यांना पूर्वी लहान लहान गरजा भागविण्यासाठी देखील कर्ज घ्यावे लागायचे. परंतु आता सरकारच्या निर्णयांमुळे त्यांचे जीवन अधिक आनंदी झाले आहे. 

९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ११ वर्षे पूर्ण होत असून, त्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांना पंतप्रधान उजाळा देत आहेत. ते म्हणाले की, प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर सिंचन पंपासाठी ६०% अनुदान दिले जाते. 

योजनांमुळे उत्पन्न, उत्पादन क्षमतेत झाली वाढ 
पंतप्रधान म्हणाले की, माती दर्जा कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पोषणतत्त्वांचे अहवाल दिले जातात. ज्यामुळे योग्य खतांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविता येते. प्रधानमंत्री कुसुम योजनेनुसार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर सिंचन पंपासाठी अनुदान दिले जाते. अशा योजनांमुळे उत्पन्न, उत्पादन वाढले. 

पंतप्रधान २० जूनला ओडिशा दौऱ्यावर येणार 
ओडिशात भाजप सरकारच्या पहिल्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी पंतप्रधान  २० जून रोजी त्या राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ओडिशात भाजप सरकार १२ जून २०२४ रोजी स्थापन झाले. १२ जून रोजी पहिला वर्धापन दिन आहे. मात्र पंतप्रधानांच्या उपलब्धतेनुसार हा कार्यक्रम २० जून रोजी होईल. 

Web Title: Loans should be taken first for small needs, good changes have taken place in the agricultural sector, says Prime Minister Narendra Modi