शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना १0 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 05:49 IST

केरळ सरकारचा मनोदय; कुटुंबाला १0 हजार रुपये भरपाई

तिरूअनंतपूरम : केरळमधील पावसाचे तडाखे आणि पूर यांमुळे छोटे व्यापारी, व्यावसायिक, दुग्ध उत्पादक शेतकरी यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना १0 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी दिली.

याशिवाय निर्वासित शिबिरांतून कुटुंबे आपल्या घरी परततील, तेव्हा त्यांना १0 हजार रुपयांची भरपाई देणार आहे. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. लोकांच्या घरात पुरामुळे साचलेला चिखल काढण्याचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत १ लाख ३१ हजार ६८३ घरांमधून चिखल काढण्याचे काम सरकारी कर्मचारी व स्वयंसेवक यांनी मिळून केले आहे. याशिवाय पावसामुळे विजेचे पडलेले खांब दुरुस्त करण्यात आले आहेत वा त्या ठिकाणी नवे खांब उभारले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरू होण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. आतापर्यंत २५ लाख ६0 हजार घरे व दुकानांपैकी २३ लाख ३६ हजार ठिकाणी वीजपुरवठा सुरू झाला आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आता अनेकांना घरी परतायचे आहे. शिबिरांमध्ये १0 लाख ४0 हजार ६६८ लोक होते. पण काही जण घरी परतल्याने आता ही संख्या ८ लाख ६९ हजार ७२४ वर आली आहे.

पायाभूत सुविधा पूर्ववत करण्यावर राज्य सरकारचा भर दिसत आहे. मात्र पावसाने व पुराने वाहून गेलेले व खचलेले रस्ते दुरुस्त करण्यास काही काळ लागेल, असे दिसत आहे. राज्याच्या काही भागांत अद्याप किरकोळ पाऊ स सुरू आहे, तर काही भागांत आजही पाणी आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीत अडचणी येत आहेत. मात्र सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत ती कामेही पूर्ण करण्याचे सरकारने ठरविले असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. ज्या भागांत उन्ह आहे, तिथे रस्ते दुरुस्ती सुरू केली आहे, असे तो म्हणाला.३६ जण अद्याप बेपत्ताकेरळमध्ये ८ आॅगस्टपासून आतापर्यंत पावसाने घेतलेल्या बळींची संख्या २६५ असून, अद्याप ३६ जण बेपत्ता आहेत. तेही पुरामध्ये वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)यंदा ओणमचा उत्साह नाहीचकेरळमध्ये ओणम हा मोठा उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. केवळ हिंदूच नव्हेत, तर ख्रिश्चन व मुस्लीम घरांमध्येही तो साजरा केला जातो, पण पाऊ स व पुरामुळे प्रचंड मनुष्य व वित्तहानी झालेल्या या राज्यात आज हा सण साजराच केला नाही. मात्र, निर्वासित शिबिरांमध्ये काही गोड प्रकार बनविण्यात आले होते. केरळबाहेर राहणाºया मल्याळी लोकांमध्येही ओणमचा उत्साह आज दिसला नाही. ओणमला पाहुण्यांना घरी जेवायला बोलावले जाते. केळीच्या पानावर जेवण वाढले जाते आणि जेवणात किमान २४ खाद्यप्रकार असतात, पण यंदा ते चित्र दिसले नाही. देशा-परदेशांतील अनेक मल्याळी लोकांनी सण साजरा न करता, ती रक्कम मुख्यमंत्री निधीला दिली वा आपल्या कुटुंबाला ते पैसे पाठविले.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ