Ayodhya Live Updates : श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 16:45 IST2018-11-24T10:36:02+5:302018-11-24T16:45:04+5:30

अयोध्या -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी (24 नोव्हेंबर) आणि रविवारी (25 नोव्हेंबर) अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. राम मंदिर निर्माणासंदर्भात भाजपा ...

Ayodhya Live Updates : श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही- उद्धव ठाकरे | Ayodhya Live Updates : श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

Ayodhya Live Updates : श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

ठळक मुद्देराम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमकउद्धव ठाकरेंचा कुटुंबीयांसहीत अयोध्या दौराअनुचित प्रकार टाळण्यासाठी अयोध्येत जमावबंदी लागू

अयोध्या -  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी (24 नोव्हेंबर) आणि रविवारी (25 नोव्हेंबर) अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. राम मंदिर निर्माणासंदर्भात भाजपा सरकारनं जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देण्यासाठी उद्धव ठाकरे हा दौरा करत आहेत. राम मंदिर निर्माणाच्या मागणीसाठी काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना 25 नोव्हेंबरला अयोध्येत एकत्र येणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यादिवशीच विश्व हिंदू परिषदेनेही धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. एकूणच राम मंदिर निर्माणावरुन पुन्हा राजकारण तापू लागले आहे. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्यानं उत्तर प्रदेश सरकारनं अयोध्या आणि परिसरात जमावबंदी लागू केली आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात 

दोन दिवसांत अयोध्येत कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून केंद्रीय राखीव पोलीस, राज्य पोलीस आणि अन्य निमलष्करी दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वादग्रस्त रामजन्मीभूमीच्या विद्यमान स्थितीत कोणीही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तात्काळ रोखण्यात यावे, असे आदेश सुरक्षा दलांना सरकारकडून देण्यात आले आहेत.   

उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम
- उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे विशेष विमानाने अयोध्येत दाखल होतील.

- दुपारी 1.34 वाजता उद्धव ठाकरे कुटुंबीयांसहीत फैजाबाद विमानतळावर दाखल

- यांनतर लक्ष्मण किल्ला येथे साधूसंतांचे ते आशीर्वाद घेणार आहेत

-  25 नोव्हेंबरला (रविवारी) उद्धव ठाकरे कुटुंबासहीत सकाळी 9 वाजता राम लल्लाचे दर्शन घेतील. येथील एका सभेलाही ते संबोधित करतील. 

Ayodhya Live Updates :

LIVE

Get Latest Updates

05:31 PM

तारीख नही बतायेंगे नाही, आता तारीख सांगावी लागेल- ठाकरे

05:31 PM

हिंदू स्वस्थ बसणार नाही, तो प्रश्न विचारणारच- ठाकरे
 

05:31 PM

मंदिरासाठी आणखी किती वर्ष वाट पाहायची?- ठाकरे
 

05:31 PM

न्यायालयाच्या निर्णयाआधी संसदेनं कायदा करावा- ठाकरे
 

05:31 PM

रामाच्या दर्शनासाठी आलोय, राजकारणासाठी नाही- ठाकरे
 

05:30 PM

संसदेत मंदिरासाठी कायदा करा, सेना पाठिशी- ठाकरे
 

05:29 PM

श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

04:44 PM

श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही- उद्धव ठाकरे

04:06 PM

उद्धव ठाकरे यांचं लक्ष्मण किल्ला येथे पुष्पवृष्टीनं जंगी स्वागत

04:02 PM

अयोध्येत उद्या उद्धव ठाकरेंची रॅली



 

04:01 PM

उद्धव ठाकरे सहकुटुंब लक्ष्मण किल्ला येथे दाखल

03:05 PM

उद्धव ठाकरे सहकुटुंब लक्ष्मण किल्ल्याकडे रवाना

02:35 PM



 

02:33 PM



 

02:26 PM



 

02:09 PM

उद्धव ठाकरे कुटुंबीयांसहीत पंचवटी हॉटेलमध्ये दाखल

02:00 PM

संपूर्ण ठाकरे कुटुंब पहिल्यांदाच अयोध्येच्या दौऱ्यावर 

लक्ष्मण किल्ल्यावर संत पूजन, आशीर्वाद उत्सव कार्यक्रमात होणार सहभागी

 

01:38 PM

उद्धव ठाकरे सहकुटुंब लक्ष्मण किल्ल्याकडे रवाना

01:37 PM

विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात उद्धव ठाकरेंचं जोरदार स्वागत

 

01:34 PM

उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल, शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

01:28 PM

- थोड्याच वेळात उद्धव ठाकरे अयोध्येत होणार दाखल

- शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज

12:13 PM

नाशिकमधील शिवसैनिक अयोध्येत दाखल

11:35 AM

मुंबई : मतांचं राजकारण बाजूला ठेऊन हिंदुत्वाच्या बाजूने येतील त्यांना सोबत घेऊ - मनोहर जोशी

11:20 AM

अयोध्या दौऱ्याचा राजकीय फायदा होईल -मनोहर जोशी

11:15 AM

अपुरे राहिलेलं कार्य उद्धव ठाकरे पूर्ण करताहेत - मनोहर जोशी

11:04 AM

कोणत्याही परिस्थिती राम मंदिर झाले पाहिजे - मनोहर जोशी, ज्येष्ठ नेते शिवसेना

10:53 AM

उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे विमानतळाकडे रवाना



 



 

10:41 AM

(शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्याची मनसेने उडवली खिल्ली, शिवसेना भवनासमोर झळकले पोस्टर)

 

10:41 AM

अयोध्येतील कायदा-सुव्यवस्थेला बाधा येऊ देणार नाही - शिवसेना खासदार संजय राऊत 

10:40 AM

मुंबई : अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली 

10:40 AM

कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात



 

Web Title: Ayodhya Live Updates : श्रद्धा न्यायालयात मोजली जाऊ शकत नाही- उद्धव ठाकरे