हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 10:48 AM2019-04-03T10:48:09+5:302019-04-03T11:20:19+5:30

राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Live mortar bomb found near Nal-Bikaner Air Force Station, Indian Air Force officials present at the spot | हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ

हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ

Next
ठळक मुद्दे राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास करण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे.गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट करण्यात आले आहे.

जयपूर - राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी आणि पुढील तपास करण्यासाठी हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहे.

गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांकडून भारतीय सैन्याच्या तळांना टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी (3 एप्रिल) हवाई दलाच्या तळाजवळ आढळून आलेल्या जिवंत बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. सीआरपीएफ जवानांचा हा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारतीय हवाई दलाकडून एअर स्ट्राईक करत बालकोट परिसरातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं होतं. 


पूंछ सेक्टरमध्ये LoC जवळ दिसली दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने, अलर्ट जारी

भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले होते. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ 10 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानची दोन विमाने घिरट्या घालत असल्याचे भारतीय हवाई दलाच्या रडारने टिपले होते. यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 


पाकच्या गोळीबाराला भारताकडून चोख प्रत्युत्तर, 3 पाकिस्तानी जवान ठार 

 पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनालाभारतीय जवानांनी चोख उत्तर दिलं आहे. पाकिस्तानच्या 3 जवानांना भारतीय जवानांनी ठार केलं असून अन्य 1 जवान गोळीबारात जखमी झाला आहे. एलओसीवरील रावलकोट सेक्टरमध्ये भारतीय लष्करी जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबारात जशास तसे उत्तर दिले आहे. पाकच्या मिडीयाकडून अधिकृतरित्या ही आकडेवारी समोर आली असली तरी भारत-पाक गोळीबारात पाकिस्तानच्या 3 पेक्षा अधिक सैन्य मारले गेल्याची माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. 

भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा येथील लस्सीपुरा भागात पहाटेपासून सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं असून दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. 

लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तूल जप्त करण्यात आली असून परिसरामध्ये लष्कराकडून शोधमोहीम सुरुच आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामाच्या त्राल परिसरात गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एका सामान्य नागरिकाला दहशतवाद्याने गोळी मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मंजूर अहमद हजाम असं या जखमी नागरिकाचे नावं आहे. 

 

Web Title: Live mortar bomb found near Nal-Bikaner Air Force Station, Indian Air Force officials present at the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.