LIVE - शहिदांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटली गर्दी

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 16:03 IST2019-02-16T09:13:29+5:302019-02-16T16:03:57+5:30

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ ...

LIVE - शहिदांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटली गर्दी | LIVE - शहिदांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटली गर्दी

LIVE - शहिदांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटली गर्दी

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाले आहेत. भारताच्या या वीर जवानांना देशभरातून आदरांजली वाहण्यात येत असून, महाराष्ट्रातील दोन शहीद जवानांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. 

LIVE

Get Latest Updates

07:56 PM

राजस्थानमधल्या पोखरणमध्ये हवाई दलानं केलं शक्तिप्रदर्शन



 

06:19 PM

शहीद नसीर अहमद यांना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी वाहिली श्रद्धांजली


04:19 PM

जम्मू-काश्मीरमधल्या काही नागरिकांना दहशतवाद्यांकडून धमक्या, गृह मंत्रालयाने आज सर्व राज्यांना अधिसूचना केली जारी



 

04:15 PM

जवान शहीद झाल्यानं देश शोकसागरात बुडालाय. शहिदांच्या कुटुंबीयांना आम्ही अतिरिक्त  5 लाखांची मदत देणार- चंद्राबाबू नायडू


03:43 PM

प्रयागराजमध्ये शहीद जवान महेश कुमार यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात



 

03:31 PM

वाराणसीतील शहीद जवान रमेश यादव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार



 

03:28 PM

काश्मीरमध्ये ज्या जवानांनी देशासाठी प्राण अर्पण केले, त्यांचं बलिदान आम्ही कायम लक्षात ठेवू- राहुल गांधी



 

02:42 PM

तामिळनाडूमधील सीआरपीएफ जवान सी. शिवचंद्रन यांना संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी वाहिली आदरांजली



 

02:22 PM

शहीद जवान संजय राजपूत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

बुलडाणा - मलकापूर येथे शहीद जवान संजय राजपूत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

02:09 PM

शहीद सीआरपीएफ जवान पंकज कुमार त्रिपाठी यांच्यावर हारपूर तोला येथे अंत्यसंस्कार



 

01:42 PM

शहीद सीआरपीएफ जवान अश्विनी कच्ची यांचे पार्थिव त्यांच्या मध्य प्रदेशमधील गावी दाखल



 

01:40 PM

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी शहीद जवान एच. गुरू यांना वाहिली आदरांजली



 

12:27 PM

शहीद संजय राजपूत आणि शहीद नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर दाखल

औरंगाबाद - शहीद संजय राजपूत आणि शहीद नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद विमानतळावर दाखल

12:22 PM

द्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक औरंगाबाद विमानतळावर दाखल

औरंगाबाद : बुलढाणा जिल्ह्यातील शहीद जवानांचे पार्थिव विमानतळावर येणार; श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक विमानतळावर दाखल

11:41 AM

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन जवानांवर दुपारी चार वाजता मूळ गावी अंत्यसंस्कार होणार

बुलढाणा : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड यांच्यावर दुपारी चार वाजता मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

10:36 AM

बिहारमधील शहीद जवान रतन कुमार ठाकूर आणि संजय कुमार सिन्हा यांना मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी वाहिली आदरांजली



 

10:35 AM

पुलवामा येथील हल्ल्यात वीरमरण आलेले सीआरपीएफ जवान मोहन लाल यांना त्यांच्या मुलीने वाहिले श्रद्धांजली



 

10:25 AM

सीआरपीएफ जवान मोहन लाल यांना उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी वाहिली आदरांजली



 

09:18 AM

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेले वारणसी येथील जवान रमेश यादव यांना शेवटचा निरोप देण्यासाठी नागरिकांची गर्दी



 

09:17 AM

सीआरपीएफ जवान रोहितास लांबा यांचे पार्थिव शरीर त्यांच्या मूळ गावी दाखल



 

09:15 AM

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील बुलडाणा येथील दोन जवानांवर आज होणार अंत्यसंस्कार

पुलवामा येथील हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह दीक्षित (राजपूत) आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड हे दोन जवान शहीद झाले होते.

Web Title: LIVE - शहिदांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटली गर्दी