शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 13:08 IST

Shubhanshu Shukla Astronaut: भारतीय हवाई दलातील दशकभराच्या कारकिर्दीत त्यांनी विविध लढाऊ विमानांचे २,००० तासांहून अधिक काळ उड्डाण केले आहे.

नवी दिल्ली/लखनऊ : स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटवर स्वार होत अंतराळाच्या दिशेने झेपावलेल्या ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी केवळ स्वतःचे बालपणीचे स्वप्न पूर्ण केले नाही तर संपूर्ण देशाच्या आशा-आकांक्षांना पंख दिले आहेत. ३९ वर्षीय शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरणार आहेत तसेच १९८४ मध्ये राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात गेलेले दुसरे भारतीय ठरले आहेत. 

भारतीय हवाई दलातील दशकभराच्या कारकिर्दीत त्यांनी विविध लढाऊ विमानांचे २,००० तासांहून अधिक काळ उड्डाण केले आहे. लखनऊमध्ये जन्मलेले आणि ‘शक्स’ या कॉलसाइनने ओळखले जाणारे शुक्ला हे इस्रो व नासाच्या सहकार्याने ॲक्सिअम स्पेसच्या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह चार अंतराळवीर असलेले ड्रॅगन यान फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून बुधवारी अंतराळात प्रक्षेपित करण्यात आले. शुक्ला यांची मोठी बहीण सुची शुक्ला यांनी सांगितले की, लहानपणी एकदा शुभांशू यांनी एअर शो पाहिला होता. विमानांचा वेग व आवाज त्यांना फार आकर्षक वाटला. तिथूनच त्यांना उड्डाणाची स्वप्नं पडू लागली. 

अशी आहे गगनभरारी घेणाऱ्या शुक्ला यांची पार्श्वभूमी 

ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांची २०१९मध्ये गगनयान मोहिमेसाठी निवड झाली. त्यावेळी त्यांच्यासोबत प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप आणि अजित कृष्णन या इतर वैमानिकांचीही चाचणीद्वारे निवड झाली होती. गगनयान ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम असून, ती २०२७ मध्ये पार पडण्याची शक्यता आहे.

१० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनऊ येथे जन्मलेले शुक्ला यांनी सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून (सीएमएस) शिक्षण घेतले आणि नंतर नॅशनल डिफेन्स अकॅडमीत प्रवेश घेतला. 

२००६ मध्ये हवाई दलात भरती झाल्यानंतर त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२९, जग्वार, डॉर्निअर-२२८ ही लढाऊ विमाने चालविली. त्यांनी आयआयएससी बेंगळुरूमधून एअरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमटेक केले आहे. त्यांनी रशियातील गगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर आणि इस्रोच्या बंगळुरू येथील अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात अंतराळ मोहिमेचे प्रशिक्षण घेतले. 

लखनऊ शहरात  ठिकठिकाणी पोस्टर

लखनऊ शहरभर शुभांशू शुक्ला यांचे पोस्टर झळकत आहेत. यातून ऐतिहासिक अंतराळ यात्रेबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या शाळेने ‘व्योमोत्सव’ नावाच्या कार्यक्रमाचे विशेष आयोजन केले होते. 

त्याद्वारे शाळेच्या संपूर्ण कॅम्पसला एका ‘मिनी स्पेस सेंटर’चे रूप देण्यात आले होते. या उत्सवात ॲक्झिकॉम मोहिमेचे थेट प्रक्षेपण, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची प्रतिकृती तसेच दुर्बिणीतून अवकाश दर्शन अशा गोष्टी उपस्थितांना  बुधवारी अनुभवायला मिळाल्या.

असे आहे शूभांशू शुक्ला यांचे करिअर

२००६ मध्ये हवाई दलात भरती झाल्यानंतर शुभांभूंना लढाऊ विमानांच्या २००० तासांहून अधिक कालावधीच्या उड्डाणाचा अनुभव आहे. 

मोहिमेतील त्यांचे सहकारी म्हणतात...

ॲक्सिअम-४ मोहिमेतील त्यांच्या सहकाऱ्यांनी शुभांशू शुक्ला यांचे वर्णन ‘ऑपरेशनल-सॅव्ही’, ‘फोकस्ड’ आणि ‘स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जबरदस्त हुशार’ असे केले आहे. 

शुभांशू यांनी ॲक्सिअम-४ मोहिमेतील अंतराळयानाच्या प्रक्षेपणाच्या दिवशी स्वदेस चित्रपटातील ‘यूं ही चला चल…’ हे गाणे ऐकले. सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या प्रमुख गीता गांधी किंघडन यांनी सांगितले की, आमचा एक जिज्ञासू विद्यार्थी अंतराळवीर झाला ही  अभिमानाची गोष्ट आहे.

पत्नीशी शालेय जीवनापासूनच ओळख

शुभांशू शुक्ला यांच्या पत्नीचे नाव कामना आहे. त्यांचे लग्न ठरवून झालेले असले तरी कामना यांना शुभांशू हे शालेय जीवनापासून ओळखतात. या दाम्पत्याला कियांश नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. 

भांगड्याच्या तालावर  अंतराळ सफरीचे स्वागत

लखनऊ : ‘हिप हिप हुर्रे’च्या गजरात, उत्स्फूर्त भांगड्याच्या तालात आणि आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे अशा वातावरणात लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलने बुधवारी एक अविस्मरणीय सकाळ अनुभवली.

आपला मुलगा अवकाशात झेपावत असल्याचा क्षण थेट प्रक्षेपणाद्वारे शुभांशू यांचे वडील शंभू शुक्ला व कुटुंबीयांनी तसेच सीएमएस कानपूर रोडच्या वर्ल्ड युनिटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनुभवला.

त्यांचे वडील शंभू शुक्ला म्हणाले, शुभांशूची अवकाश सफर हा क्षण केवळ आमच्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी गौरवाचा क्षण आहे. या क्षणी काय बोलावे, तेच सुचत नाही. माझे आशीर्वाद नेहमीच असणार आहेत. ग्रुप कॅप्टन शुभांशू यांच्या आई आशा शुक्ला म्हणाल्या की, ही माझ्यासाठी खूप मोठी घटना आहे. 

या मोहिमेत तो नक्की यशस्वी होईल. तो पृथ्वीवर परत येण्याचीही आम्ही सर्व जण आतुरतेने वाट पाहणार आहोत. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनेक मान्यवर, शूभांशू यांचे शिक्षक, लष्करी अधिकारी, विद्यार्थी प्रक्षेपण पाहण्यासाठी जमले.

टॅग्स :NASAनासा