"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 17:30 IST2025-11-16T17:30:18+5:302025-11-16T17:30:55+5:30
"मी आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे वडील आणि माझे राजकीय गुरू लालू प्रसाद यादव जी यांना विनंती करतो की, बाबा, मला एक संकेत द्या, तुमचा केवळ एक इशारा आणि बिहारचे लोक स्वतः या जयचंदांना जमिनीत गाडतील. ही लढाई कुण्या पक्षाची नाही, तर कुटुंबाच्या सन्मानाची, मुलीच्या प्रतिष्ठेची आणि बिहारच्या स्वाभिमानाची आहे."

"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर, राष्ट्रीय जनता दल (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या निवडणूक निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांनी केवळ राजकारणच सोडले नाही, तर आपले कुटुंबाशी असलेले संबंधही तोडण्याची घोषणा केली आहे. यानंतर, आता त्यांचे मोठे बंधू तेजप्रताप यादव त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत आणि त्यांनी रोहिणी यांच्या कथित विरोधकांना थेट इशारा दिला आहे.
तेजप्रताप यादव यांनी 'सुन लो जयचंदो' म्हणत सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी विरोधकांना इशारा दिला. त्यांनी लिहिले, "कालच्या घटनेने माझ्या मनाला मोठा हादरला बसल आहे. माझ्यासोबत जे घडले, ते मी सहन केले... मात्र, माझ्या बहिणीचा जो अपमान झाला आहे, तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाऊ शकत नाही. ऐका जयचंदांनो, कुटुंबावर वार कराल तर, बिहारची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही.”
तेजप्रताप म्हणाले, रोहिणीवर चप्पल उचलल्याची बातमी ऐकूण प्रचंड संताप झाला. काही विशिष्ट चेहऱ्यांनी तेजस्वी यादव यांच्या बुद्धीवरही पडदा टाकला आहे. या अन्यायाचा परिणाम अत्यंत भयावह असेल. काळाचा हिशेब फार कठोर असतो.
तेजप्रताप यादव पुढे म्हणाले, "मी आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे वडील आणि माझे राजकीय गुरू लालू प्रसाद यादव जी यांना विनंती करतो की, बाबा, मला एक संकेत द्या, तुमचा केवळ एक इशारा आणि बिहारचे लोक स्वतः या जयचंदांना जमिनीत गाडतील. ही लढाई कुण्या पक्षाची नाही, तर कुटुंबाच्या सन्मानाची, मुलीच्या प्रतिष्ठेची आणि बिहारच्या स्वाभिमानाची आहे."