शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

पद्म पुरस्कारप्राप्त विजेत्यांची यादी

By admin | Updated: January 26, 2016 03:21 IST

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ११२ पद्म पुरस्काराची घोषणा केली. यापैकी १० मान्यवरांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण, तसेच ८३ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ११२ पद्म पुरस्काराची घोषणा केली. यापैकी १० मान्यवरांना पद्मविभूषण, १९ जणांना पद्मभूषण, तसेच ८३ जणांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पद्मविभूषण : धीरुभाई अंबानी (मरणोत्तर) - रिलायन्स समूहाचे संस्थापक (महाराष्ट्र), श्री श्री रविशंकर - आध्यात्मिक गुरू (कर्नाटक), यामिनी कृष्णमूर्ती - शास्त्रीय नृत्यांगना (दिल्ली), रजनीकांत - अभिनेते (तामिळनाडू), गिरीजा देवी - शास्त्रीय गायिका (प.बंगाल),रामोजी राव - माध्यम सम्राट (आंध्र प्रदेश), जगमोहन - जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल (दिल्ली), व्ही. शांता - कर्करोग तज्ज्ञ (तामिळनाडू),व्ही.के. आत्रे - शास्त्रज्ञ व डीआरडीओचे माजी प्रमुख (कर्नाटक), अविनाश दीक्षित - भारतीय वंशाचे अमेरिकन अर्थतज्ज्ञ.पद्मभूषण : अनुपम खेर - अभिनेता (महाराष्ट्र), उदित नारायण झा - गायक (महाराष्ट्र), स्वामी तेजोमयानंद - चिन्मय मिशन(महाराष्ट्र), एन.एस. रामानुज ताताचार्य - संस्कृत पंडित (महाराष्ट्र), हाफीज कॉन्ट्रॅक्टर - आर्किटेक्ट (महाराष्ट्र),इंदू जैन - बेनेट कोलमन अँड कंपनीच्या प्रमुख (दिल्ली), विनोद राय - माजी नियंत्रक व महालेखा परीक्षक(केरळ),दिवंगत स्वामी दयानंद सरस्वती (मरणोत्तर) - आर्य समाजाचे संस्थापक (उत्तराखंड), सानिया मिर्झा - टेनिसपटू (तेलंगण),सायना नेहवाल - बॅडमिंटनपटू (तेलंगण), डी. नागेश्वर रेड्डी - गॅस्ट्रोएनटोरोलॉजिस्ट (तेलंगण), आर. सी. भार्गव - मारुती सुझुकीचे प्रमुख (उत्तर प्रदेश), राम सुतार - मूर्तिकार (महाराष्ट्र), यारालगड्डा लक्ष्मी प्रसाद - हिंदी व तेलगू लेखक (आंध्र प्रदेश),ए.व्ही रामा राव - शास्त्रज्ञ (आंध्र प्रदेश), बरजिंदर सिंह हमदर्द - पंजाबी पत्रकार (पंजाब), हाइसनेम कन्हैयालाल - मणिपुरी रंगमंच कलावंत (मणिपूर), रॉबर्ट ब्लॅकविल - माजी राजदूत (विदेशी), पालोनजी शापूरजी मिस्त्री - भारतीय वंशाचे उद्योजक (आयर्लंड)पद्मश्रीसुभाष पाळेकर - शेतीतज्ज्ञ (महाराष्ट्र), अ‍ॅड. उज्ज्वल निकम - विशेष सरकारी वकील (महाराष्ट्र), अजय देवगण- अभिनेता (महाराष्ट्र), प्रियांका चोपडा- अभिनेत्री (महाराष्ट्र), मधुर भांडारकर - दिग्दर्शक, निर्माता (महाराष्ट्र), पीयुष पांडे - जाहिरात गुरू (महाराष्ट्र), गणपती दादासाहेब यादव - विज्ञान आणि अभियांत्रिकी (महाराष्ट्र), सुधारक ओलवे - सामाजिक कार्यकर्ते (महाराष्ट्र), दिलीप सांघवी- उद्योगपती(महाराष्ट्र), केकी होरमुसजी घारदा - उद्योगपती (महाराष्ट्र), सईद जाफरी (मरणोत्तर)- अभिनेते, प्रतिभा प्रल्हाद - शास्त्रीय नृत्यांगना (दिल्ली), भिखूदन गढवी- लोकगायक (गुजरात), श्रीभासचंद्र सुपकर- टेक्सटाइल डिझायनर (उ.प्रदेश), तुलसीदास बोरकर- शास्त्रीय संगीत (गोवा), सोमा घोष- शास्त्रीय गायिका (उ.प्रदेश), नीला मदहाब पांडा - चित्रपट दिग्दर्शक, निर्माता (दिल्ली), एस.एस. राजामौली - दिग्दर्शक, निर्माता (कर्नाटक), व्यंकटेश कुमार - लोककलावंत (कर्नाटक), गुलाबी सपेरा - लोकनृत्य ( राजस्थान), ममता चंद्रकार - लोकसंगीत (छत्तीसगड), मालिनी अवस्थी- लोकसंगीत (उ.प्रदेश), जयप्रकाश लेखीवाल - चित्रकार (दिल्ली), के. लक्ष्मा गौड -चित्रकार (तेलंगण), बालचंद्र दत्तात्रेय मोंधे -छायाचित्रकार (म.प्रदेश), नरेशचंदेर लाल - रंगमंच कलावंत (अंदमान-निकोबार), धीरेंद्रनाथ बेझबरूआ, साहित्यिक (आसाम), प्रल्हादचंद्र तसा- साहित्यिक (आसाम), रवींद्र नागर- साहित्यिक (दिल्ली), दयाभाई शास्त्री- साहित्यिक (गुजरात), संतेशिवर भैरप्पा- साहित्यिक (कर्नाटक), हलदर नाग- साहित्यिक (ओडिशा), कामेश्वरम ब्रह्मा- साहित्यिक, पत्रकार (आसाम), पुष्पेश पंत- साहित्यिक, पत्रकार (दिल्ली), जवाहरलाल कौल - साहित्यिक, पत्रकार (जम्मू-काश्मीर), अशोक मलिक- साहित्यिक (दिल्ली), मन्नम गोपीचंद - हृदयरोग तज्ज्ञ (तेलंगण), रविकांत - शल्यचिकित्सक (उ.प्रदेश), रामहर्ष सिंग- आयुर्वेद (उ.प्रदेश), शिव नारायण कुरील - बालरोग तज्ज्ञ (उ. प्रदेश), सब्या साची सरकार - रेडिओलॉजिस्ट (उ.प्रदेश), आला गोपाल कृष्ण गोखल - हृदयशल्य चिकित्सक (उ.प्रदेश), टी. के. लाहिरी - हृदयरोग तज्ज्ञ (उ.प्रदेश), प्रवीण चंद्र -हृदयरोग तज्ज्ञ (दिल्ली), दलजितसिंह गंभीर - हृदयरोग तज्ज्ञ (उ. प्रदेश), चंद्रशेखर शेषाद्री थोगुलुवा - गॅस्ट्रोएनटोरोलॉजिस्ट (तामिळनाडू), अनिलकुमारी मल्होत्रा -होमिओपॅथी तज्ज्ञ (दिल्ली), एम. व्ही पद्म श्रीवास्तव - न्यूरोलॉजिस्ट (दिल्ली), सुधीर व्ही. शाह - न्यूरोलॉजिस्ट (गुजरात), एम.एम. जोशी - नेत्ररोग तज्ज्ञ (कर्नाटक), जॉन एब्रेझर - अस्थिरोग तज्ज्ञ(कर्नाटक), नायुदम्मा यार्लागड्डा - बालरोग तज्ज्ञ (आंध्र), सीमोन ओरान - पर्यावरण संरक्षक (झारखंड), इम्तियाज कुरेशी - पाककला विशेषज्ञ (दिल्ली), रवींद्रकुमार सिन्हा - वन्यजीव संरक्षक (बिहार), एच. आर.नागेंद्र - योगतज्ज्ञ (कर्नाटक), एम.सी. मेहता -लोककामकाज (दिल्ली), एम. एन.कृष्णमणी - लोककामकाज (दिल्ली), तोखेहो सेमा - लोककामकाज (नागालँड), सतीश कुमार- शास्त्रज्ञ (दिल्ली), मिलस्वामी अण्णादुराई - विज्ञान आणि अभियांत्रिकी (कर्नाटक), दीपांकर चॅटर्जी - विज्ञान आणि अभियांत्रिकी (कर्नाटक), वीणा टंडन - विज्ञान आणि अभियांत्रिकी (मेघालय), आेंकारनाथ श्रीवास्तव - विज्ञान आणि अभियांत्रिकी (उ. प्रदेश), सुनीता कृष्णन - सामाजिक कार्यकर्त्या (आंध्र), अजॉय कुमार दत्त - सामाजिक कार्यकर्ते (आसाम), पंडित दसा - सामाजिक कार्यकर्ते (कर्नाटक), पी.पी. गोपीनाथ नायर - सामाजिक कार्यकर्ते (केरळ), मेडेलीन हर्मन डी ब्लीक - सामाजिक कार्यकर्ते (पुड्डुचेरी), श्रीनिवासन दमल कंदलाई - सामाजिक कार्यकर्ते (तामिळनाडू), टी.व्ही. नारायण - सामाजिक कार्यकर्ते (तेलंगण), अरुणाचलम मुरुगंथम - सामाजिक कार्यकर्ते (तामिळनाडू), दीपिका कुमारी - नेमबाजी (झारखंड), सुशील दोशी - खेळाडू (म.प्रदेश), महेश शर्मा - उद्योगपती (दिल्ली), सौरभ श्रीवास्तव - उद्योगपती (दिल्ली), श्रीप्रकाशचंद्र सुराणा (मरणोत्तर) - शास्त्रीय संगीत (राजस्थान), मायकेल पोस्टेल - पुरातत्त्व शास्त्रज्ञ (फ्रान्स), सलमाल अमीन सल खान - भारतीय वंशाचे विदेशी साहित्यिक, हुई लान झांग - योगतज्ज्ञ (चीन), प्रेदराग के. निकीक - योगतज्ज्ञ (सर्बिया), सुंदर आदित्य मेनन - भारतीय वंशाचे सामाजिक कार्यकर्ते, अजयपालसिंह बंगा- भारतीय वंशाचे उद्योगपती.