लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् खरेदी करा दारू, इटावा शहरातील दुकानांवर लागले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 20:51 IST2021-05-30T20:49:15+5:302021-05-30T20:51:50+5:30
vaccine certificate : लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करू नये, अशा कडक सूचना एसडीएमने दुकानदारांना दिल्या आहेत.

लसीकरण प्रमाणपत्र दाखवा अन् खरेदी करा दारू, इटावा शहरातील दुकानांवर लागले पोस्टर
इटावा : उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यात दारूच्या दुकानांची तपासणी केली जात आहे. अलिगडमध्ये विषारी दारूच्या घटनेनंतर राज्यात प्रशासन आणि पोलीस पूर्णपणे सक्रीय झाले आहे. ठिकठिकाणी दारूचे ठेके व दारू दुकानांची तपासणी केली जात आहे. (liquor will not be available in etawah district of up without vaccine certificate)
याच अनुषंगाने सैफई येथे तैनात एसडीएम हेम कुमार सिंग यांनी त्यांच्या परिसरात पोलीस दलासह दारूचे ठेके, दारूची दुकाने तपासली. तसेच, या दारू दुकानांवर पोस्टर लावण्यात आले. पोस्टरवर असे लिहिले आहे की, ज्यावेळी लोक कोरोना लसीकरण प्रमाणपत्र दाखवतील, त्यावेळीच दारू विकली जाईल. पहिल्यांदा लस घ्या, नंतर दारू खरेदी करायला या.
लसीकरणाचे प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मद्यविक्री करू नये, अशा कडक सूचना एसडीएमने दुकानदारांना दिल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे देशात लसीकरणानंतर केवळ तीन टक्के लसीकरण झाल्यानंतर लसीकरणाचे टार्गेट वाढविण्यासाठी आता अधिकारी वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. दरम्यान, दारूची दुकाने महसूल वाढविण्यात ज्या प्रकारे सहकार्य करतात, त्याच प्रकारे राज्यात लसीकरण वाढविण्यासाठी दारूच्या दुकानांचा देखील सहारा घेतला जात आहे.
एसडीएम साहेब आले होते. पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच, लसीकरण प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय दारूची विक्री करू नये, असे सांगितले आहे. आता आम्ही बहुतेक लोकांना लस घेण्यास सांगत आहोत. बरेच लोक लसीकरणाचे प्रमाणपत्र न घेता आले, आम्ही त्यांना दारू न विकता परतून पाठवून देत आहोत, असे एका दुकानदारांने सांगितले.
#Coronavirus : लहान मुलांसाठी झायडस कॅडिलाने विकसित केली लस, जुलै अखेरपर्यंत मंजुरी मिळणार? https://t.co/9vnweXTUGU#CoronaVaccine#zyduscadila
— Lokmat (@MiLOKMAT) May 30, 2021
उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, दारू दुकानांसाठी ग्राहकांना लसीकरण करण्याचे अधिकृत आदेश नाही. परंतु जर सैफईचे एसडीएम हे करत असतील तर ते त्यांच्या स्वत: च्या निर्णयावरुन करत आहेत. लसीकरणासाठी प्रेरित करणे चांगली गोष्ट आहे, परंतु दारू विक्रीसाठी अनिवार्य नाही.