घरफोडीत १६ तोळे सोन्याचे दागिने लंपास
By Admin | Updated: August 8, 2015 00:23 IST2015-08-08T00:23:48+5:302015-08-08T00:23:48+5:30
पंचवटी : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथील बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़ गुरुवारी (दि़६) भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़

घरफोडीत १६ तोळे सोन्याचे दागिने लंपास
प चवटी : हिरावाडीतील (शिवकृपानगर) येथील बंगल्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे १६ तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे़ गुरुवारी (दि़६) भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे़शिवकृपानगरमधील स्वप्नपूर्ती बंगल्यात उदय शिवाजी जगताप हे कुटुंबासह राहत असून पती-पत्नी दोघेही नोकरी करतात़ गुरुवारी नेहेमीप्रमाणे हे दोघे कामावर, मुली शाळेत तर आई जवळच राहणार्या भावाकडे गेली होती़ ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व १५-२० हजार रुपयांची रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला़सायंकाळी मुली शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना बंगल्याचा दरवाजा उघडा तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले़ त्यांनी जवळच राहणार्या काकांच्या घरी धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली़ यानंतर जगताप कुटुंबीयांना फोनद्वारे चोरीची माहिती दिल्यानंतर ते घरी पोहोचले व पोलिसांनी घटनेची माहिती दिली़ दरम्यान शुक्रवारी जगताप यांनी तक्रार देण्यासाठी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती़ (प्रतिनिधी)