'आयुष्य फक्त निवडणूक लढण्यासाठी नाहीये'; हुसैन यांची याचिका, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:26 IST2025-01-21T17:24:48+5:302025-01-21T17:26:08+5:30

दिल्ली दंगल प्रकरणातील आरोपी ताहीर हुसैन यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाच्या टिप्पणी केल्या. 

'Life is not just for contesting elections'; Hussain's petition, what happened in the Supreme Court? | 'आयुष्य फक्त निवडणूक लढण्यासाठी नाहीये'; हुसैन यांची याचिका, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

'आयुष्य फक्त निवडणूक लढण्यासाठी नाहीये'; हुसैन यांची याचिका, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?

Delhi Election Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने एमआयएमचे उमेदवार ताहीर हुसैन यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील सुनावणी २२ जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. सर्वोच्च न्यायालयानेदिल्ली पोलिसांना उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. न्यायमूर्ती म्हणाले की, 'जर न्यायालयाला वाटले की, ताहीर यांना नियमित जामीन दिला पाहिजे, तर असे का केले जाऊ नये? न्यायालय आपले डोळे बंद करू शकत नाही.'

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सुनावणीवेळी ताहीर हुसैन यांच्या वकिलांनी सांगितले की, काही साक्षीदारांच्या सांगण्यावरून ताहीर यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत. यावर न्यायालय म्हणाले की, आरोप पत्रानुसार, हत्या झाली त्यावेळी ताहीर हुसैन तिथे हजर होते. तुम्ही नियमित जामिनासाठी याचिका करा. तुम्ही अंतरिम जामिनावर इतका जोर का देत आहात? आयुष्य हे फक्त निवडणूक लढण्यासाठी नाहीये", अशा न्यायालयाने सुनावले. 

प्रचारासाठी जामीन याचिका

दिल्ली दंगलीतील आरोपी मोहम्मद ताहीर हुसैन यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंठपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. 

सोमवारीही या प्रकरणावर सुनावणी झाली. २० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने ताहीर हुसैन यांच्या याचिकावर गंभीर टिप्पणी केली होती. "तुरुंगात बसून निवडणूक जिंकणे सोपं आहे. अशा लोकांना निवडणूक लढवण्यापासून रोखले पाहिजे", असे न्यायालय म्हणाले होते. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २२ जानेवारी रोजी होणार आहे. 

Web Title: 'Life is not just for contesting elections'; Hussain's petition, what happened in the Supreme Court?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.