मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबारातील तिघांना जन्मठेप

By Admin | Updated: August 22, 2015 00:43 IST2015-08-22T00:43:32+5:302015-08-22T00:43:32+5:30

एप्रिल २०११ ची घटना : इब्राहिम कासकरचा अंगरक्षक आरिफ याचा खून

Life imprisonment for three of Pakmodia Street firing in Mumbai | मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबारातील तिघांना जन्मठेप

मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबारातील तिघांना जन्मठेप

्रिल २०११ ची घटना : इब्राहिम कासकरचा अंगरक्षक आरिफ याचा खून
विजय मोरे, नाशिक
मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर एप्रिल २०११ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व छोटा राजन गँगमध्ये गोळीबार झाला होता़ यामध्ये दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरचा अंगरक्षक आरिफचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणी आरोपी इंद्र लालबहादूर खत्री (३१, नेपाळ), बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद (३२, कौसा, मुंबई), अब्दुल रशाद अब्दुल रशीद शेख या तिघांना मुंबईच्या विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश ए़ एल़ पानसरे यांनी जन्मठेप व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे़
या गोळीबार प्रकरणी जे़ जे़ मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी इंद्र खत्री, बिलाल सय्यद या दोघांनी जे़ जे़ हॉस्पिटलजवळ पकडण्यात आले होते़ या खटल्याचे गांभीर्य पाहता शासनाने ॲड़ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती़ यामध्ये त्यांनी ५३ साक्षीदार तपासून आरोपीविरुद्ध न्यायालयात सबळ पुरावे सादर केले़ गोळीबारात मृत्यू झालेला आरिफ हा गँगस्टर नसून अंगरक्षक असल्याचे न्यायालयासमोर आले़ तसेच त्याच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्या या आरोपींनी वापरलेल्या बंदुकीतून झाडल्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबचा अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे महत्त्वाचे ठरले़ (प्रतिनिधी)
-कोट--
समाजावर वेळोवेळी गँगस्टर्सकडून निर्माण केल्या जात असलेल्या दहशतीस न्यायालयाच्या या निकालामुळे निश्चितच आळा बसेल़
- ॲड़अजय मिसर,
विशेष सरकारी वकील, एटीएस़

Web Title: Life imprisonment for three of Pakmodia Street firing in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.