शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

एलआयसीचा आयपीओ २०२१ च्या वित्तीय वर्षातील उत्तरार्धात विक्रीस- राजीवकुमार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 3:08 AM

कायद्यात बदल करावे लागणार

नवी दिल्ली : निर्गुंतवणुकीतून मोठा निधी उभारण्यासाठी एलआयसीतील केंद्र सरकारचे काही भागभांडवल आयपीओद्वारे विकले जाणार आहे. २०२१ या वित्तीय वर्षाच्या उत्तरार्धात हे आयपीओ विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे, असे वित्त सचिव राजीवकुमार यांनी रविवारी सांगितले.

एलआयसीचे आयपीओ विक्रीस आणण्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२०२१ या वित्त वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी लोकसभेत सादर करताना केली होती. वित्त सचिव राजीवकुमार यांनी सांगितले की, एलआयसीचे आयपीओ विक्रीला आणण्याआधी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागणार आहेत. त्यासाठी काही कायद्यांमध्येही सुधारणा कराव्या लागतील. यासंदर्भात केंद्रीय कायदा मंत्रालयाशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी पूर्ण करून मगच २०२१ च्या उत्तरार्धात एलआयसीचे आयपीओ विक्रीसाठी आणले जाण्याची शक्यता आहे.

ते म्हणाले की, एलआयसीच्या आयपीओ विक्रीचा व्यवहार अत्यंत पारदर्शकपणे पार पाडला जाईल. एलआयसीतील केंद्र सरकारच्या भागभांडवलापैकी १० टक्के वाटा विक्रीसाठी उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

एलआयसी व आयडीबीआयचे आर्थिक नाते

निर्गुंतवणुकीतून निधी उभारण्याचे दोन लाख रुपयांचे वाढीव उद्दिष्ट असून आयडीबीआय बँकेतील सरकारचे काही भागभांडवलही लोकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. एलआयसी ही आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. आयडीबीआय बँक संकटात आलेली असताना तिला सावरण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार एलआयसीने काही भागभांडवल या बँकेत गुंतविले. या निर्णयाबद्दल त्या वेळेस केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती.

योगासनांच्या जादुई व्यायामाने मोदींनी अर्थव्यवस्था सावरावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या योगासनांच्या ‘जादुई व्यायामा’चा प्रयोग देशाची डळमळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी करावा, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी लगावला. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पास ‘पोकळ’ असे संबोधणाऱ्या राहुल गांधींनी टीकेचा रोख मोदींकडे वळविला.

आपल्या निवासस्थानाच्या हिरवळीवर हात उंचावून उड्या मारणाऱ्या मोदींच्या व्हिडिओसह केलेल्या टष्ट्वीटमध्ये गांधी यांनी पंतप्रधानांना उद्देशून लिहिले: तुमचा जादुई व्यायाम थोडा जास्त करा. कोणी सांगावे त्यामुळे कदाचित अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. सन २००८ नंतर विकासाचा दर सर्वात कमी म्हणजे ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मोदींनी स्वत:च्या तंदुरुस्तीप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनीयातून अप्रत्यक्षपणे सुचविले.

टॅग्स :budget 2020बजेटNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनLIC - Life Insurance CorporationएलआयसीNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था