शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
2
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
3
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
4
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
5
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
6
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
7
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
8
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
9
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
10
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
11
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
12
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
13
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 
14
हिमाचल प्रदेशमध्ये ३ अपक्ष आमदारांचा राजीनामा मंजूर, आता या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक
15
निकालाआधीच दिल्लीत हालचालींना वेग! नितीश कुमार यांनी पीएम मोदींची घेतली भेट, अमित शहा यांचीही भेट घेणार
16
शिवसेना तोडली, पण उद्धव ठाकरेंना संपवू शकले नाहीत; महाराष्ट्राचा एक्झिट पोल, भाजपाला सतावणारा
17
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
18
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
19
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
20
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

महाविकास आघाडी सरकार उखडून जनतेची सुटका करा; जे. पी. नड्डा यांचा कार्यकर्त्यांना संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2021 7:18 AM

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संदेश

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या राजधानीत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर महावसुली आणि भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला. असे सरकार उखडून टाकून जनतेची सुटका करायची आहे, असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सेवा आणि लोकांमध्ये जाऊन काम करण्याचा मंत्र दिला.

भाजपामध्ये परिवारवाद नाही. सेवा, संकल्प आणि समर्पण यामुळेच हा पक्ष इतरांपेक्षा वेगळा आहे, असे मत मांडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  मोदी म्हणाले की, सामान्य नागरिकांशी सतत चांगले संपर्क असल्यानेच भाजप आज केंद्रात सर्वोच्च स्थानी आहे. पंतप्रधान नमो अॅपवरील कमल पुष्प फीचरला उल्लेख करून मोदी म्हणाले  की, या माध्यमातून कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान आणि निस्वार्थ भावनेने केलेले सेवाकार्य लोकांसमोर आणले पाहिजे. 

आगामी निवडणुका जिंकण्याचा विश्वास

पक्षाने पारित केलेल्या राजकीय प्रस्तावांमध्ये आगामी काळात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणीपूरमध्ये भाजपला चांगला विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांत निवडणुकांसाठी संघटनेने केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले.  प. बंगालमध्ये निवडणुकांदरम्यान तृणमूल काँग्रेसने हिंसाचार केल्याचा आरोप करण्यात आला. कोरोना साथीच्या काळात विरोधी पक्षांच्या एकूण वागणुकीबाबत यावेळी टीका करण्यात आली.

अडवाणी-जोशी व्हीसीद्वारे सहभागी

बैठकीस गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथसिंह, पीयूष गोयल यांच्यासह सर्व ज्येष्ठ उपस्थित होते. पक्षाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. 

मोदी सरकारच्या कामगिरीची स्तुती

नड्डा यांनी मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या निर्णयांची स्तुती केली. कोरोनासंकटात लागू केलेला लॉकडाऊन, आरोग्य सुविधांची उपलब्धता तसेच चांगल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली असे ते म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपा