VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:59 IST2024-04-29T18:54:19+5:302024-04-29T18:59:54+5:30
Viral Video : इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असलेल्या एका मुलीबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर या मुलीने प्रतिक्रिया दिली आहे.

VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
level sabke niklenge girl : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये असे काही व्हिडीओ असतात त्यातील संवाद हे कायमच लक्षातच राहतात. इन्स्टाग्रामवर अशा व्हिडीओंचा खच पडलेला असतो. पण गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर मल्टीलेव्हल मार्केंटिग करणाऱ्या तरुण तरुणींच्या यशाचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यासगळ्यामध्ये 'लेवल निकलेंगे उसके जो खड़ा रहेगा यहां पे...' असं म्हणणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असेल. पण त्या व्हिडीओतल्या तरुणीचं पुढं काय झालं आणि तो कोण आहे याची माहिती आता समोर आली आहे.
खरंतर हा व्हिडीओ २०१८ मधील आहे आणि त्यामध्ये दिसणाऱ्या मुलीचे नाव लक्ष्मी शर्मा आहे. लक्ष्मीने म्हटलेल्या त्या डायलॉगवर तिला एवढा आत्मविश्वास होता की तिने ते खरं करुन दाखवल्याचे ती सांगते. लक्ष्मी शर्माच्या या व्हिडीओवरुन अनेक मीम्सदेखील तयार झाले होते.जुना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर किती लेव्हल निघाली हे सांगण्यासाठी लक्ष्मीने पुन्हा एक व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओमध्ये तिने व्हायरल झालेली मुलगी आपणच असल्याचे म्हणत तो सात वर्षापूर्वीचा असल्याचे म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये लक्ष्मी आपण चंदीगड येथील असल्याचे सांगते. लक्ष्मीला विश्वास नव्हता की तिचा तो डायलॉग इतका व्हायरल होईल. लक्ष्मी म्हणते तुम्ही हा व्हिडीओ आता पाहिला असेल पण तो माझ्या संघर्षाच्या काळातील आहे. पुढे तिने सांगितले की, ती लॉकडाऊननंतर कोट्यधीश बनली. लक्ष्मीने दावा केला की तिचा मोठा आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे आणि तिच्याकडे घरे, कार ते कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मात्र व्यवसाय आणि मालमत्तेबद्दल दावे करताना, लक्ष्मीने कोणतेही तपशील दिले नाहीत.
मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणजे काय?
मल्टी लेव्हल कंपन्या या सामान्यतः लाली, लिपस्टिक, फेस क्रीम किंवा वजन कमी करणारी औषधे अशा वस्तू विकते. यामध्ये कंपनी तुमच्याकडून १००० रुपये घेते आणि त्याबदल्यात काही वस्तू देते. या वस्तूंसोबत कंपनी तुम्ही कोट्यधीश व्हाल असं आश्वासनही ग्राहकांना देते. मात्र योबत कंपनी एक चेन सिस्टमचे सूत्र ही सांगते. यामध्ये एका ग्राहकाने वस्तू घेतल्यानंतर त्यांना आणखी दोन ग्राहकांना कंपनीसोबत जोडण्यास सांगते. त्यानंतर ते दोन लोक आणि दोन लोकांना या स्किममध्ये गुंतवणूक करण्यास सांगतात.पुढे पुढे ही साखळी वाढत गेली आणि हा ट्रेंड चालू राहीला तर तुमच्या मागून जोडल्या गेलेल्या लोकांच्या खर्चातून तुमचा फायदा होणार असा दावा कंपनीकडून केला जातो. या फायद्यातून तुम्ही महागड्या गाड्या आणि बंगले घेऊ शकता अशी स्वप्ने देखील दाखवली जातात.