शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस का पडला?... जाणून घ्या ठळक कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 19:36 IST

पंतप्रधान मोदींनी रविवारी 'मन की बात'मधून त्यांचे विचार मांडले.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला. लोकलसाठी व्होकल व्हा, याचा पुनरुच्चार मोदींनी केला. खेळण्यांच्या निर्मितीत देशाला अग्रेसर होण्याची संधी आहे. त्यामुळे यासाठी स्टार्टअप्स कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही मोदींनी केलं. मात्र मोदींची 'मन की बात' अनेकांना पटलेली दिसत नाही. भाजपाच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरील आकडेवारीतून ही बाब अधोरेखित झाली आहे. 

पंतप्रधान मोदींनी रविवारी 'मन की बात'मधून त्यांचे विचार मांडले. भाजपानं त्यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनवरून 'मन की बात'चा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून २४ तास झाले आहेत. सध्याच्या घडीला (३१ ऑगस्ट संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) जवळपास २७ लाख जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आतापर्यंत १ लाख ९ हजार लोकांनी व्हिडीओ लाईक केला. तर डिसलाईक करणाऱ्यांची संख्या ६ लाख ९४ हजार इतकी आहे. म्हणजेच डिसलाईक करणाऱ्यांचं जास्त आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी मोदींच्या 'मन की बात'बद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर १ लाख १७ हजार कमेंट्स आल्या आहेत. यातल्या बहुतांश कमेंट्स नकारात्मक आहेत. मात्र मोदींच्या 'मन की बात'वर डिसलाईक्सचा पाऊस का पडला, याच ठळक कारणं 'लोकमत'च्या संपादकीय मंडळातील अनुभवी मंडळींनी मांडलेली आहे.

'लोकमत'च्या संपादकीय मंडळातील अनुभवी मंडळींनी मांडलेली मतं अशीः

कोरोनामुळे देशात अनेक प्रकारची संकटे उभी असताना केवळ कोरडी भाषणे ऐकण्याचा देशाचा मूड नाही,  हेच मोदींच्या व्हिडीओला मिळालेल्या 'डिसलाइक'मधून सिद्ध होतं. ढासळलेली अर्थव्यवस्था, भडकलेली महागाई, वाढती बेरोजगारी यामुळे जनता होरपळून निघाली आहे. त्यांना आता भाषणाची नव्हे कृतिशील नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे या डिसलाईक्समधून योग्य तो संदेशपंतप्रधान कार्यालय घेईल, अशी आशा बाळगूया.- विनायक पात्रुडकर, संपादक

कोरोनाची लस, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या परीक्षा, रोजगारनिर्मितीचे सरकारचे प्लॅन या अत्यंत महत्त्वपूर्ण, गंभीर आणि जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षरही बोलले नाहीत. वास्तविक, लहान मुलांची खेळणी आणि आत्मनिर्भर भारत या विषयांना प्राधान्य देण्याच्या मनःस्थितीत नागरिक आज आहेत का?, याचा विचार त्यांनी करायला हवा. त्याचप्रमाणे, देशवासीय कोरोना संकटाने, बेरोजगारीने, आर्थिक समस्यांनी त्रस्त असताना, मोरासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणंही काहीसं चमत्कारिकच होतं. तेही अनेकांना रुचलेलं नाही. त्यामुळे 'मन की बात'वर एवढे 'डिसलाईक्स'चा  आले असावेत, असं वाटतं.- संजीव साबडे

कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. अनलॉक झाले असले तरी सारेच काही सुरळीत झालेले नाही. दुकाने, बाजारपेठा उघडल्या आहेत खऱ्या; पण ग्राहकांच्या मनातील भीती गेलेली नाही. अशा स्थितीत भविष्याची चिंता दूर करणारे विचार किंवा भूमिका पंतप्रधान मोदी यांच्याकडून मांडली जाणे अपेक्षित होते. परंतु नेहमीप्रमाणे केवळ गोडीगुलाबीची 'मन की बात' त्यांनी केली, तेव्हा आता जनतेच्याही लक्षात यातील उसनेपणा आल्यानेच त्याला डिसलाइक्स अधिक मिळाले. रोजगाराचे, महागाईचे व  जगण्याचेच प्रश्न समोर असताना पंतप्रधानांनी आत्मनिर्भरतेचा डोस पाजला व मुलांच्या खेळण्याचा खुळखुळा वाजवला, परंतु जनता आता दूधखुळी राहिलेली नाही. ही भाषणबाजी आता सुज्ञांना कळू लागली आहे, हाच बोध यातून घ्यायचा!- किरण अग्रवाल, संपादक

'मन की बात'वरील डिसलाईक्स पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी 'आय ओपनर' ठरू शकतात आणि त्या अर्थाने हे चित्र स्वागतार्हच म्हणता येईल. मात्र, यावरून मोदींची लोकप्रियता उतरणीस लागली असा निष्कर्ष इतक्यात काढता येणार नाही. डिसलाईक या विशिष्ट 'मन की बात' बाबत असू शकतो. याशिवाय सोशल मिडियावरील ट्रेंड बनविण्याचे वा फिरविण्याची तंत्रे आता भाजपाप्रमाणे विरोधी पक्षांनाही ठाऊक झाली आहेत. लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर, विशेषत: रोजगार, बॅंकाचे व्याज व कोरोनाचे नियंत्रण यावर मोदी बोलले असते तर अधिक चांगले झाले असते. पण यावरील ठोस उत्तरे मोदी वा त्यांच्या सल्लागारांना मिळालेली नाहीत, हेही मोदींनी 'मन की बात' साठी निवडलेल्या विषयावरून लक्षात येते. - प्रशांत दीक्षित, संपादक

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारत