एकमेकां सहाय्य करू... अखिलेश म्हणतात आमच ठरलंय, मी CM अन् मायावती PM

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:57 PM2019-05-09T14:57:40+5:302019-05-09T14:58:40+5:30

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावतींना पंतप्रधानपदी पाहायचे असल्याचे म्हटले आहे.

Let us help each other ... Akhilesh yadav said, I have decided, I am CM and Mayawati is PM | एकमेकां सहाय्य करू... अखिलेश म्हणतात आमच ठरलंय, मी CM अन् मायावती PM

एकमेकां सहाय्य करू... अखिलेश म्हणतात आमच ठरलंय, मी CM अन् मायावती PM

लखनौ - लोकसभा निवडणुकांच्या पाच टप्प्यातील मतदान मतदान पूर्ण झाले असून आता केवळ 2 टप्प्यातील मतदान बाकी आहे. मात्र, तत्पूर्वीच 23 मेच्या निकालाची चर्चा देशात जोर धरत आहे. उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून आप-आपली रणनिती आखण्यात येत आहे.

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मायावतींनापंतप्रधानपदी पाहायचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, आमची आघाडी ही कुठल्याही मजबुरीमुळे झाली नसून एका संकल्पावर आधारीत असल्याचेही अखिलेश यांनी म्हटले आहे. तसेच आमची आघाडी केवळ एसपी, बीएसपीच नाही तर आरएलडीदेखील सोबत असल्याचेही अखिलेश म्हणाले. तसेच, मी मायावती यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मेहनत आहे. तर, मायावती यांनीही मला मुख्यमंत्री बनविण्यासाठी मतद करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील सपा-बसपाची आघाडी एकमेका सहाय्य करू.. अवघे धरू सीएम आणि पीएमपद अशीच म्हणावी लागेल.

दरम्यान, अखिलेश यादव यांनी मुंबई मिरर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मी सीएम तर मायावती पीएम पदासाठी इच्छुक आणि प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. 
 

Web Title: Let us help each other ... Akhilesh yadav said, I have decided, I am CM and Mayawati is PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.