शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
2
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
3
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
4
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
6
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
7
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
8
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
9
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
10
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
11
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
12
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
13
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
14
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
15
बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?
16
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
17
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
18
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
19
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
20
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?

हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 14:45 IST

हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश असून प्रमाण वाढवण्याची मागणी केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली: देशातील उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये महिला न्यायाधीशांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याबाबत चिंता व्यक्त करत, सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे. आगामी काळात होणाऱ्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची विनंती त्यांनी भारताच्या सरन्यायाधीशांना आणि कॉलेजियमला केली आहे.

बार असोसिएशनने व्यक्त केली नाराजी : बार असोसिएशनने नुकत्याच झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त्यांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, २०२१ पासून सर्वोच्च न्यायालयात एकाही महिला न्यायाधीशाची नियुक्ती झालेली नसून ही परिस्थिती निराशाजनक आहे.

न्यायव्यवस्थेसाठी लैंगिक समानता का महत्त्वाची?बार असोसिएशनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी यापूर्वीही २४ मे आणि १८ जुलै रोजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांना पत्र लिहून उच्च न्यायव्यवस्थेतील महिला प्रतिनिधित्व वाढवण्याची मागणी केली होती. न्यायव्यवस्थेमध्ये लैंगिक समानता असणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे न्याय व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास वाढेल, न्यायिक दृष्टिकोन अधिक समृद्ध होईल. समाजातील विविधता योग्यरीत्या प्रतिबिंबित होईल, असे संघटनेचे मत आहे. 

धक्कादायक आकडेवारी

महिला न्यायाधीशांची कमतरता: देशभरात उच्च न्यायालयांमध्ये १,१०० न्यायाधीशांची मंजूर पदे आहेत. यापैकी ६७० पदावर पुरुष न्यायाधीश आहेत, तर १०३ पदांवर महिला कार्यरत आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत.

काही राज्यांमध्ये स्थिती गंभीर: उत्तराखंड, त्रिपुरा, मेघालय व मणिपूर यांसारख्या उच्च न्यायालयांमध्ये सध्या एकही महिला न्यायाधीश नाही. 

सर्वोच्च न्यायालयातही निराशा: २०२० नंतर सर्वोच्च न्यायालयात एकाही महिला न्यायाधीशाची नियुक्ती झालेली नाही. सध्या सर्वोच्च न्यायालयात एकच महिला न्यायाधीश कार्यरत आहेत.

टॅग्स :Courtन्यायालय