Video - गुजरात सचिवालय परिसरात शिरला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 11:37 IST2018-11-05T11:30:57+5:302018-11-05T11:37:43+5:30

गांधीनगरमध्ये गुजरात सचिवालय परिसरात बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याचा मुक्त संचार  सचिवालय परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Leopard entered Secretariat premises in Gujarat's Gandhinagar, early morning today | Video - गुजरात सचिवालय परिसरात शिरला बिबट्या

Video - गुजरात सचिवालय परिसरात शिरला बिबट्या

नवी दिल्ली - गुजरात सचिवालय परिसरात बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याचा मुक्त संचार सचिवालय परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या परिसरात या बिबट्याला पकडण्यासाठी 100 लोकांच्या टीमचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.



गुजरात सचिवालय परिसरात तब्बल 130 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामधील एका कॅमेऱ्यात परिसरात बिबट्या शिरल्याचा व्हिडीओ कैद झाला आहे. सोमवारी  सचिवालय परिसराचे दैनंदिन कामकाज सुरू होते. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी आज कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. 

Web Title: Leopard entered Secretariat premises in Gujarat's Gandhinagar, early morning today