शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

विधानसभा पोटनिवडणूक - गोव्यात मनोहर पर्रिकर तर, दिल्लीत अरविंद केजरीवालांची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 12:01 PM

तीन राज्यातील विधानसभेच्या चार जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून, दिल्लीत मुख्यंत्री अरविंद केजरीवाल तर, गोव्यामध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्देपर्रीकरांसमोर  काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचे आव्हान आहेप्रतापसिंग राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला.

नवी दिल्ली, दि. 23 - तीन राज्यातील विधानसभेच्या चार जागांसाठी आज पोटनिवडणूक होत असून, दिल्लीत मुख्यंत्री अरविंद केजरीवाल तर, गोव्यामध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नवी दिल्लीतील बावाना, आंध्रप्रदेशातील नानद्याल तर,  गोव्यात पणजी आणि वालपोई या दोन जागांसाठी मतदान होत आहे. नवी दिल्लीतील बावाना विधानसभा मतदारसंघातील आपचे आमदार वेद प्रकाश यांनी मार्च महिन्यात भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे इथे निवडणूक होत आहे. 

मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळल्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून जाणे आवश्यक आहे. पर्रिकरांसाठी पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर यांनी आपली आमदारकी सोडली. पर्रीकरांसमोर  काँग्रेसच्या गिरीश चोडणकर यांचे आव्हान आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे पुत्र विश्वजीत राणे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे वालपोईमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यांच्यासमोर रॉय रवी नाईक यांचे आव्हान आहे. मार्च महिन्यात गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विश्वजित राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

आंध्रप्रदेशच्या नानद्यालमध्ये आमदार भुमा नागी रेड्डी यांच्या निधनामुळे विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. दिल्लीतील पोटनिवडणूकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाची कसोटी लागली आहे. कारण काही महिन्यांपूर्वी झालेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पार धुव्वा उडाला होता.  

पोटनिवडणुकीतून ‘आप’ची माघार गोव्याची राजधानी पणजी तसेच वाळपई विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने जाहीर केलं. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेलं होतं. आम आदमी पक्षाने या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या होत्या; पण त्यांचा एकही उमेदवार टिकाव धरू शकला नव्हता. निवडणुकीनंतर पक्षाचे काम थंडावले आहे. पर्रीकर यांच्या विरोधातील मते विभागली जाऊ नयेत, मतदारांचा गोंधळ उडू नये तसेच पर्रीकर यांची कोंडी व्हावी, असं आपने म्हटलं होतं. जाहीर बोलण्याची ही भाषा असली तरी संघटनात्मक ताकद कमी असल्याने आपने निवडणुका लढविल्या असत्या तरी चित्र फारसे बदलले नसते, असे राजकीय जाणकारांना वाटते. 

पणजी मतदारसंघातून भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे राष्ट्रीय सरचिटणीस गिरीश चोडणकर लढत देतील. भाषा माध्यमाच्या मुद्द्यावरून भाजपशी पंगा घेतलेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाने पक्षाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनाच निवडणूक रिंगणात उतरविले आहे. पर्रिकर यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी न देणे आणि निवडणुकीच्या माध्यमातून पर्रिकर यांच्यावर भाषा माध्यमाचा प्रश्न सोडविण्यासाठी दबाव टाकण्याची खेळी गोवा सुरक्षा मंच खेळण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना त्यांना साथ देण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली