शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

राजस्थानच्या विधानसभेमध्ये भूत-आत्म्यांचा वावर, आमदारांमध्ये भीतीचे वातावरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:56 IST

एखादे पडके घर, निर्मनुष्य ठिकाण, आडवाट येथे भूताप्रेतांचा वावर असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण राजस्थानमध्ये चक्क राज्याच्या विधानसभेलाच भूताने झपाटल्याची चर्चा असून...

जयपूर - एखादे पडके घर, निर्मनुष्य ठिकाण, आडवाट येथे भूताप्रेतांचा वावर असल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण राजस्थानमध्ये चक्क राज्याच्या विधानसभेलाच भूताने झपाटल्याची चर्चा असून, विधानसभेच्या इमारतीत भूत आत्म्यांचा वावर असल्याची शंका राज्यातील आमदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या भूतबाधेमुळेच राज्याच्या विधानसभेत दोनशे आमदारांची संख्या फार काळ टिकत नसल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. राजस्थानच्या विधानसभेची सदस्यसंख्या दोनशे आहे. मात्र सभागृहात पैकीच्या पैकी आमदार फार काळ टिकत नाहीत. कधी कुणी राजीनामा देतो, तर कुणाला तुरुंगवास होतो, कधी कुणाचा अकस्मित मृत्यू होतो. या सर्वासाठी विधानसभेतील प्रेतात्मा कारणीभूत असल्याचा दावा आमदारांनी केला आहे. आमदारांनी आपल्या मनातील भीतीबाबत मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच शांतीसाठी पुजाऱ्यांना बोलावून विशेष पूजा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान गुरुवारी राजस्थान विधानसभेच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी एक पुजारी पूजा विधी करताना दिसत होता. राजस्थानमधील भाजपा आमदार कल्याण सिंह चौहान यांचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.  त्यानंतर राजस्थानमधील अन्य आमदारांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी मांडलगड येथील भाजपा आमदार कीर्ती  कुमारी यांचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाला होता. त्याआधी बीएसपीचे आमदार बी.एल. कुशवाहा यांना हत्येच्या आरोपाखाली अटक झाली होती.  त्यापूर्वी गेल्या विधानसभेतील काँग्रेसचे आमदार महिपाल मणेरदा, मलखान सिंह बिश्नोई आणि बाबू लाल नागर यांना हत्येच्या आरोपाखाली तुरुंगवास झाला होता. राजस्थानच्या विधानसभेचे बांधकाम ज्या ठिकाणी करण्यात आले त्यातील काही भाग स्मशानाच्या जमिनीत झाले होते. विधानसभेच्या इमारतीपासून 200 मीटर अंतरावर लालकोठी मोक्षधाम नावाचे स्मशान आहे. राजस्थानच्या विधानसभेची इमारत एकूण 17 एकर परिसरात पसरलेली असून, 1994 ते 2001 या काळात या विधानसभेच्या इमारतीचे बांधकाम झाले होते. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानnewsबातम्याPoliticsराजकारण