प्रेमासाठी सोडला देश, नाव अन् धर्मही त्यागला, बेल्जियमच्या युवतीचे पंजाबी युवकाशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 08:47 IST2022-11-13T08:45:44+5:302022-11-13T08:47:36+5:30
Love Marriage :

प्रेमासाठी सोडला देश, नाव अन् धर्मही त्यागला, बेल्जियमच्या युवतीचे पंजाबी युवकाशी लग्न
- बलवंत तक्षक
चंडीगड : बेल्जियमच्या युवतीने पंजाबी शीख युवकाशी विवाह करण्यासाठी देश तर सोडलाच, पण त्यानंतर नाव बदलून शीख धर्मही स्वीकारला. पंजाबच्या कपूरथळा येथील जैल सिंह नामक निहंगशी युवतीची फेसबुकवर मैत्री झाली होती. त्याचे रूपांतर नंतर प्रेमात झाले. विवाह करण्यासाठी या युवतीने अमृतपान करून शीख धर्म स्वीकारला व जगदीप कौर असे नाव घेतले आहे. जवळीक वाढल्यामुळे प्रेम जुळले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्यावर ही युवती बेल्जियम सोडून थेट पंजाबमध्ये दाखल झाली.
पंजाबी भाषा शिकतेय
दोहोंमध्ये मैत्री झाल्यावर बेल्जियमच्या युवतीला पंजाबी भाषा समजत नव्हती. तिला केवळ इंग्रजी भाषा येत होती. आता ती पंजाबी भाषा शिकत आहे व पंजाबी संस्कृती अंगीकारण्याचा प्रयत्न करीत आहे.