शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
4
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
5
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
6
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
7
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
8
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
9
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
10
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
12
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
13
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
14
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
15
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
16
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
17
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
18
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
19
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
20
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
Daily Top 2Weekly Top 5

केरळमध्ये येणार डाव्या आघाडीचे सरकार, काँग्रेसचा पराभव

By admin | Updated: May 19, 2016 14:16 IST

केरळ विधानसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट झाला असून, इथे डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली एलडीएफचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ऑनलाइन लोकमत 

तिरुअनंतपूरम, दि. १९ - केरळ विधानसभा निवडणूकीचा निकाल स्पष्ट झाला असून, इथे डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली एलडीएफचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ आघाडीला मतदारांनी नाकारले आहे. १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत एलडीएफ ९० जागांवर आघाडीवर आहे. यूडीएफ ४७ जागांवर आघाडीवर आहे. 
 
 
 
गेल्या काहीवर्षांपासून केरळमध्ये जोरदार प्रयत्न करणा-या भाजपला अखेर विजयाचा सूर गवसला आहे. नेमॉम विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी झाला आहे. प्रारंभी भाजपला दहा जागांवर आघाडी मिळाली होती. पण नंतर ही आघाडी फार काळ टिकली नाही. केरळमध्ये भाजपचा चंचू प्रवेश झाला आहे. केरळमधले मतदार एलडीएफ आणि यूडीएफ आघाडीला दरपाचवर्षांनी आलटून-पालटून संधी देत असतात तीच परंपरा यावेळी कायम राहिली आहे. पी.विजयन एलडीएफचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात. मुख्यमंत्रीपदाचे दुसरे दावेदार व्ही.एस.अच्युतानंदन मलामपूझा येथून २७ हजार मतांनी विजय मिळवला. 
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 
केरळमध्ये विधानसभेच्या १४० जागा असून, सध्या केरळमध्ये काँग्रेसप्रणीत यूडीएफची सत्ता आहे. ओमेन चंडी केरळचे मुख्यमंत्री आहेत. विधासभेतील सध्याच्या संख्याबळानुसार यूडीएफचे ७३ आमदार आहेत तर, सीपीआय, सीपीएमच्या एलडीएफचे ६७ आमदार आहेत. केरळमध्ये यावेळी ७७.३५ टक्के मतदान झाले आहे. केरळमध्ये भाजपने चांगलाचा जोर लावला होता. इथे भाजप सत्तेच्या शर्यतीत नाही. मात्र या निवडणुकीव्दारे पक्षविस्तार हे भाजपचे लक्ष्य होते.
 
२०१४ लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसप्रणीत यूडीएफला इथून १२ तर, एलडीएफचा आठ जागा मिळाल्या होत्या. केरळमध्ये दर पाचवर्षांनी यूडीएफ आणि एलडीएफ असा सत्ताबदल होत राहीला आहे. केरळमध्ये एलडीएफची सत्ता येईल असा बुहतांश एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरताना दिसत आहे.