शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Leena Manimekalai: कालीमातेच्या आक्षेपार्ह पोस्टरनंतर आता लीनाने शेअर केले शिव-पार्वतीचे प्रक्षोभक फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 10:30 IST

Leena Manimekalai: काली चित्रपटातील पोस्टरवरून वाद वाढलेला असतानाच दिग्दर्शक लीना मणिमेककलई हिने अजून एक ट्विट केले आहे. या फोटोमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची भूमिका वठवत असलेले अभिनेते सिगारेट पित असताना तिने दाखवले आहे. 

नवी दिल्ली - काली चित्रपटातील पोस्टरवरून वाद वाढलेला असतानाच दिग्दर्शक लीना मणिमेककलई हिने अजून एक ट्विट केले आहे. त्यावरून आता तिच्यावर पुन्हा टीका सुरू झाली आहे. या फोटोमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची भूमिका वठवत असलेले अभिनेते सिगारेट पित असताना तिने दाखवले आहे. 

हा फोटो ट्विट करताना लीना मणिमेकलई हिने लिहिले की, कुठेतरी दुसरीकडे... त्यावरून आता ट्विटर युझर्स तिला टीकेचे लक्ष्य करत आहेत. एका युझरने लिहिले आहे की, ती केवळ द्वेष पसरवत आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, धर्माचा अपमान करणे बंद झालं पाहिजे.

लीना मणिमेकलईकडून ट्वीट करण्यात आलेल्या फोटोंवर आता राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा नेते शाहजाद पूनावाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, हा रचनात्मक अभिव्यक्तीचा विषय नाही आहे. तर हा जाणूनबुजून भावना भडकवण्याचा प्रकार आहे. हिंदूंना शिव्या देणे = धर्मनिरपेक्षता? हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान करणे = उदारमतवाद? शाहजाद पूनावाला यांनी पुढे लिहिले की, डावे पक्ष, काँग्रेस, टीएमसीकडून पाठिंबा मिळत असल्याने लीना मणिमेकलई हिचे साहस वाढले आहे. टीएमसीने महुआ मोईत्रावर कारवाई केलेली नाही.

हल्लीच लीना मणिमेकलईचा डॉक्युमेंट्री चित्रपट कालीच्या आक्षेपार्ह पोस्टरमुळे मोठा वाद निर्माण झाला होत. लीना मणिमेकलईच्या या चित्रपटातील पोस्टरमध्ये काली मातेला सिगारेट पिताना आणि एका हातात एलजीबीटीक्यूचा झेंडा दिसत होता. हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावरून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

टॅग्स :TollywoodTollywoodbollywoodबॉलिवूडIndiaभारत