शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष सोडा आणि पर्यायी सरकार बनवा, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना काँग्रेसची खुली ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 15:41 IST

भाजपाच्या नेतृत्वातील सरकारचा राजीनामा देऊन पर्यायी सरकार स्थापन करण्याचे केले आवाहन

गुवाहाटी - देशात लागू झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने आसाममध्ये मोठी खेळी केली आहे. आसामचे हित विचारात घेऊन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भाजपाच्या सरकारला सोडचिठ्ठी देत पर्यायी सरकार स्थापन करावे, अशी खुली ऑफर आसाममधील काँग्रेसच्या विधिमंडळ दलाचे नेते देबब्रत सायकिया यांनी दिली आहे. देबब्रत सायकिया यांनी आसामच्या अस्मितेचा हवाला देत सोनोवाल यांना ही ऑफर दिली आहे. ''सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यात असे सरकार स्थापन करावे जे आसाम अकॉर्डला पाठिंबा देईल आणि नारगिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू होण्यास स्थगिती देईल,''असे आवाहन देबब्रत सायकिया यांनी केले.गतवर्षी डिसेंबर महिन्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा आसाम अकॉर्डचे उल्लंघन करणारा आहे. राज्यात आसाम अकॉर्ड लागू करण्यासाठी आसामच्या विधानसभेत प्रस्ताव पारित करण्यात यावा, तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी होणेही थांबवले पाहिजे, असेही सायकिया यांनी सांगितले. राज्यात आसाम अकॉर्ड लागू करण्यात यावे अशी विनंती राज्यपालांकडेही केली. तसेच राज्याच्या हितासाठी सोनोवाल यांनी भाजपाचे सरकार सोडून पर्यायी सरकार स्थापन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

विरोध झाला तरी नागरिकत्व कायदा राबवूच; अमित शहांनी ठणकावले

'कुणाचेही नागरिकत्व धोक्यात आलेले नाही; जेएनयूमध्ये प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींची उपस्थिती'

CAA : नागरिकत्व दुरुस्ती कायदा सर्वात आधी लागू करणार, योगी सरकारचा निर्णय नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आसाममध्ये सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होत आहे. हा कायदा म्हणजे आसामची संस्कृती आणि अस्मितेवरील हल्ला आहे, असा आरोप आसामी लोक करत आहेत. राज्यात परदेशी नागरिकांना राहू देणार नाही, अशी घोषणा स्वत: मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केले आहे. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून आसामचे राजकारण नेमके कोणते वळण घेते हे पाहावे लागेल.  

टॅग्स :Sarbananda Sonowalसर्वानंद सोनोवालBJPभाजपाAssamआसामcongressकाँग्रेसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण