CJI B.R. Gavai:सर्वोच्च न्यायालयातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या न्यायालयात गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.
लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांना न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले. या घटनेनंतर, न्यायालयीन कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते, परंतु नंतर ते सुरळीतपणे सुरू झाले.
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्यासंबंधित वकील अचानक व्यासपीठाजवळ गेला आणि खाली वाकून बूट घेऊन न्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परतेने वकिलाला ताब्यात घेतले आणि बाहेर काढले.
बाहेर पडताना त्या वकिलाला “सनातन का अपमान नहीं सहेंगे” असे ओरडताना ऐकू आल्याचे साक्षीदारांनी सांगितले.
घटनेदरम्यान सरन्यायाधीश गवई पूर्णपणे शांत राहिले. त्यांनी उपस्थित वकिलांना उद्देशून म्हटले, “या सर्व गोष्टींमुळे विचलित होऊ नका. आम्ही विचलित नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.” या घटनेनंतर सुप्रिम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Web Summary : Chaos erupted in the Supreme Court as an individual threw an object towards Chief Justice B.R. Gavai during a hearing. The person was apprehended, and court proceedings were briefly suspended. The judge remained calm, dismissing the incident's impact.
Web Summary : सुप्रीम कोर्ट में सुनवाई के दौरान चीफ जस्टिस बी.आर. गवई पर एक व्यक्ति ने वस्तु फेंक दी। सुरक्षाकर्मियों ने तुरंत उसे हिरासत में ले लिया। कार्यवाही कुछ देर के लिए रुकी, लेकिन बाद में फिर शुरू हुई। न्यायाधीश शांत रहे।