शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:33 IST

सोमवारी खटल्याचे कामकाज सुरू असताना सरन्यायाधीशांच्या मंचापाशी राकेश किशोर आला आणि त्याने पायातील बूट काढून गवई यांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : खटल्याचे कामकाज सुरू असतानाच एका वकिलाने भर न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सरन्यायाधीशांना कोणतीही इजा झाली नाही. हल्लेखोर वकिलाचे नाव राकेश किशोर (७१) असे असून २०११ मध्ये त्याची सर्वोच्च न्यायालयात नोंदणी झालेली आहे.

सोमवारी खटल्याचे कामकाज सुरू असताना सरन्यायाधीशांच्या मंचापाशी राकेश किशोर आला आणि त्याने पायातील बूट काढून गवई यांच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या घटनेने सुरक्षारक्षक सावध झाले, त्यांनी तत्काळ किशोरला ताब्यात घेतले आणि त्याला न्यायालयाच्या परिसराबाहेर नेले. त्याला नेत असताना किशोर ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’, अशा घोषणा देत होता. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून, या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

रजिस्ट्रार जनरलकडून गुन्हा दाखल करण्यास नकारराकेश किशोर याची दिल्ली पोलिसांनी तीन तास चौकशी केली. पण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी राकेश किशोर याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी त्याची सुटका केली.

हल्ल्यानंतर अविचल होते सरन्यायाधीशबूटफेकीच्या प्रकारानंतर सरन्यायाधीश हे अविचल होते. त्यांनी कामकाजही थांबवले नाही. अशा घटनेने कोणीही विचलित होऊ नये, आम्हीही झालेलो नाही. अशा घटनांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधीशांनी दिली.

राकेश किशोर याचे निलंबनकोर्ट क्रमांक १ मध्ये राकेश किशोर याने सरन्यायाधीशांवर बूटफेक केल्याचे सकृतदर्शनी दिसून आले असून आपले वर्तन न्यायालयातील नियम व प्रतिष्ठेचा भंग असल्याचे स्पष्ट करत बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर याचे तत्काळ निलंबन केले आहे. त्याला १५ दिवसांत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

हल्ल्याच्या घटनेने सर्व भारतीय नाराज सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने सर्व भारतीय नाराज झाले असून अशा प्रकारच्या कृत्यांना आपल्या समाजात कोणतेही स्थान नाही, हे कृत्य निषेधार्हच आहे. सरन्यायाधीशांचे अशा प्रसंगातील वर्तन आपल्या राज्यघटनेच्या भावनेला बळकटी देणारे असून न्यायाच्या मूल्यांप्रती त्यांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

English
हिंदी सारांश
Web Title : Lawyer Throws Shoe at Chief Justice; Protests 'Sanatan Dharma Insult'

Web Summary : A lawyer threw a shoe at Chief Justice Gavai in court, protesting alleged insults to Sanatan Dharma. The lawyer, Rakesh Kishore, was arrested and later released. The Bar Council suspended Kishore. PM Modi condemned the act.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCJI BR GavaiCJI भूषण रामकृष्ण गवई