शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"मला त्याच्या भाषेचा राग आलाय, पण..."; रणवीर अलाहाबादियाच्या वकिलांनीही व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:00 IST

रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वक्तव्याचा राग आल्याचे त्याची बाजू मांडणारे वकील अभिनव चंद्रचूड यांनी म्हटलं.

Ranveer Allahbadia lawyer Abhinav Chandrachud: यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया कॉमेडियन समय रैनाच्या स्टँड-अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये आई वडिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधान केलं.  त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी रणवीर अलाहाबादियाने अधिवक्ता अभिनव चंद्रचूड यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने अलाहाबादियावर ताशेर ओढले. दुसरीकडे, अधिवक्ते अभिनव चंद्रचूड यांनी एका प्रकरणाचा हवाला देत अलाहाबादियाची बाजू मांडली.

सुप्रीम कोर्टाने मंगळवारी रणवीर अलाहाबादियाला चांगलेच खडसावले. त्याच्या मनात घाण भरली आहे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं. रणवीरला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले. यासोबतच त्याच्या अटकेवरही बंदी घालण्यात आली आहे. ज्येष्ठ वकील अभिनव चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयात रणवीर अलाहाबादियाची बाजू मांडली. मात्र डॉ. अभिवन चंद्रचूड यांनी मलाही त्या भाषेचा तिरस्कार वाटल्याचे म्हटलं.

रणवीर अलाहाबादियाला जीवे मारण्याच्या धमक्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर यांच्या खंडपीठासमोर रणवीर अलाहाबादियाच्या याचिकेवर सुनावणी झाली.  सुनावणीच्या सुरुवातीला ॲडव्होकेट चंद्रचूड म्हणाले की, "रणवीर अलाहाबादियाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याची जीभ कापणाऱ्यास ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं एका कुस्तीपटूने म्हटलं आहे. रुग्ण असल्याचे भासवून लोक त्याच्या आईच्या क्लिनिकमध्ये घुसले आहेत आणि तिला धमकावले आहे."

मला वैयक्तिकरित्या याचा राग आलाय - अभिनव चंद्रचूड

यावर न्यायमूर्ती कांत यांनी, तुम्ही त्यांनी वापरलेल्या भाषेचा बचाव करत आहात का? असा सवाल केला. त्यावर बोलताना "न्यायालयाचा अधिकारी असल्याने मला वापरलेल्या भाषेची चीड आली आहे. मला वैयक्तिकरित्या याचा राग आलाय. पण ती फौजदारी गुन्ह्याच्या पातळीपर्यंत जाते का हा वेगळा प्रश्न आहे," असं चंद्रचूड म्हणाले.

"रोज धमक्या येत असतात"

यावेळी अधिवक्ता चंद्रचूड यांनी एका आरोपीला ॲसिड हल्ल्याच्या धमक्या येत आहेत असं म्हटलं. त्यावर कोर्टाने, ठीक आहे, रोज धमक्या येत असतात. सरकार कोणतीही कारवाई करू शकते, असं म्हटलं. यावर चंद्रचूड यांनी जीभ कापण्याची धमकी मिळत असल्याचे म्हटल्यावर कोर्टाने, 'मग काय झालं? लोकप्रियता मिळवण्यासाठी तुम्ही अशा गोष्टी बोललात आणि आता त्यामुळेच धमक्या मिळत आहेत,' असं म्हटलं.

रणवीर अलाहाबादियाविरोधात दोन गुन्हे

दरम्यान,  अलाहाबादिया विरोधात फक्त दोन एफआयआर असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. "दोन किंवा तीन एफआयआर असतील तर तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. एकदा तुम्ही अनेक एफआयआरमध्ये अडकलात की तुम्हाला स्वतःचा बचाव करणे कठीण होते. या प्रकरणात न्यायालयाने तुमचे संरक्षण केले पाहिजे, पण केवळ फिर्यादी सर्वोच्च न्यायालयात येऊ शकतात, तर कोर्ट अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकते का, हे मला जाणून घ्यायचे आहे," असं खंडपीठाने म्हटलं.

टॅग्स :Ranveer Allahbadiaरणवीर अलाहाबादियाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय