शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 17:39 IST

Farmers Protest : ३०-४० शेतकरी बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली हरयाणा पोलिसांच्या ताब्यात

ठळक मुद्दे३०-४० शेतकरी पोलिसांच्या ताब्यातदोन्ही बाजूंच्या चर्चेनंतर शेतकरी नेत्यांचंही शांतता राखण्याचं आंदोलकांना आवाहन

नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत अनेकदा सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या. राजस्थान आणि हरयाणाच्या सीमेवर असलेल्या शाहजहांपूरमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या श्रीगंगानगरमधून आलेल्या तरूणांनी हरयाणापोलिसांकडून सीमेवर लावलेले बॅरिकेट्स तोडले आणि जबरदस्ती ट्रॅक्टर ट्रॉलिंना हरयाणा सीमेत नेण्याचा प्रयत्न केला. यामुळे हरयाणा पोलीस प्रशासन आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. यात अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतली. मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या शांततामय वातावरणात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही तरुणांनी एकत्र येत एक रणनीती आखली. यानुसार त्यांनी हरयाणाच्या सीमेवर लावण्यात आलेले बॅरिकेट्स तोडून जबरदस्ती अनेक ट्रॅक्टर्स हरयाणा सीमेत नेले. यानंतर हरयाणा पोलिसांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासन आणि हरयाणा सीमेत शिरलेल्या लोकांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर काही वेळ या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. राजस्थान आणि हरयाणा पोलीस प्रशासनानं काही वेळानं सर्वांशी चर्चा करून वातावरण शांत केलं. त्यानंतर शेतकरी नेत्यांनीही सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. हरयाणा पोलिसांनी ३०-४० शेतकऱ्यांना बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतलं.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीPoliceपोलिसHaryanaहरयाणाRajasthanराजस्थान