शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

फूटपाथचे नियम बनवायची शेवटची संधी, अपयश आले तर...; सुप्रीम कोर्टाने सरकारला स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:36 IST

न्यायालयाने नेमके काय आवश्यक म्हटले आहे?

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना पादचाऱ्यांचे हक्क संरक्षित करणारे नियम तयार करण्यासाठी “शेवटचा एक संधी” दिली आहे. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना पादचारी मार्ग (फुटपाथ) सुलभरीत्या वापरता येईल, याची हमी देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

१४ मे २०२५ रोजी न्यायमूर्ती अभय एस. ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले होते की, “फुटपाथ व पदचाल मार्गांचा वापर हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत दिलेल्या जीवनाच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे.” 

१ ऑगस्टला ही सुनावणी न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर झाली. वरिष्ठ वकील आणि न्यायालयाने नियुक्त केलेले अमिकस क्युरी (न्यायालयाचा मित्र) गौरव अग्रवाल यांनी सांगितले की, सरकार अद्याप मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे आणि त्या प्रमाणात पुढील अंमलबजावणी होईल. 

अग्रवाल यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच माजी न्यायमूर्ती डी. के. सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. ती रस्ते सुरक्षेसंबंधी विविध आदेशांच्या अंमलबजावणीवर देखरेख करेल. “मार्गदर्शक तत्त्वे तयार झाल्यानंतर समिती त्याची अंमलबजावणी सुरू करू शकते. विशेषतः पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण महामार्गांवर १०,००० हून अधिक पादचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. ही एक़ गंभीर बाब आहे”.  पादचाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र, दिल्ली, आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये होतात.

चार आठवड्यांत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करा

केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल विक्रमजित बॅनर्जी यांनी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येत असल्याचे न्यायालयाला सांगितले. हे नोंदवत न्यायालयाने “केंद्र सरकारने पुढील चार आठवड्यांत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करून  न्यायालयात सादर करावीत अन्यथा न्यायालय अमिकसच्या मदतीने पुढील आवश्यक कारवाई करेल, असे सांगितले. राज्य सरकारांनी देखील आपले स्वतंत्र नियम बनवावे किंवा केंद्र जी मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल, त्याचा अवलंब करावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.  

न्यायालयाने नेमके काय आवश्यक म्हटले आहे? : नागरिकांसाठी योग्य व सुरक्षित फुटपाथ. फुटपाथ दिव्यांग व्यक्तींसाठी सुलभ असणे. फुटपाथवरील अतिक्रमण हटवणे. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय