शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
2
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
3
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
4
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
5
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
6
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
7
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
8
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
9
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
10
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
11
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
12
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
13
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
14
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
15
Mahadev Munde Case: महादेव मुंडेंसोबत भांडण करणारी 'ती' व्यक्ती कोण? हत्या प्रकरणाला नवी कलाटणी
16
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
17
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
18
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
19
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
20
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय

लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:16 IST

बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये लश्कर आणि जैश दहशतवादी संघटना उघडपणे कार्यरत आहेत. जिथे कट्टरपंथी बनण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे

ढाका - पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला. आता लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यांनी बांगलादेशातील कट्टरपंथींसोबत हात मिळवणी केली आहे. भारतात दहशतवाद्यांचे नवे नेटवर्क उभं करून स्लीपर सेल बनवण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे. या दोन्ही दहशतवादी संघटना भारताने केलेल्या कारवाईनंतर आक्रमक झाल्या आहेत. या हल्ल्याचा बदला घेण्याची संधी ते शोधत आहेत. सध्या भारत-बांगलादेश यांच्यात संबंध ठीक नाहीत त्याचा पाकिस्तानी दहशतवादी फायदा घेण्याच्या तयारीत आहेत.

सैफुल्लाह कसूरीचे भाषण

लाहोरच्या कसूरमध्ये सैफुल्लाह कसूरी उर्फ खालिदचे भाषण झाले. त्या भाषणाचा वापर कट्टरपंथी दुष्प्रचार पसरवण्यासाठी करत आहेत. रिपोर्टनुसार, बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये लश्कर आणि जैश दहशतवादी संघटना उघडपणे कार्यरत आहेत. जिथे कट्टरपंथी बनण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे. भारतातील जमात ए इस्लामीसोबत मिळून ते सीमेपलीकडे नेटवर्क उभारत आहेत. बांगलादेशी विद्यापीठांचे शोषण करणाऱ्या लष्कर-ए-तोयबाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. स्थानिक कट्टरपंथीयांशी वैचारिक युती, संस्थात्मक संबंध आणि सीमापार शिक्षेतून मुक्ती. आयएसआयच्या पाठिंब्याने लष्कर-ए-तोयबा वैचारिक नेटवर्क, संस्थात्मक कमतरता आणि सीमापार कारवायांसाठी लॉजिस्टिक्स एकत्रित करत विविध रणनीतीवर काम करत आहे. 

घुसखोरी करण्यासाठी लश्कर जमात विद्यार्थी शाखांमधील इस्लीम विद्यार्थ्यांसोबत समन्वय साधत आहे. शिबिर विद्यार्थी नेटवर्क, इस्लामी अभ्यास देऊन दहशतवादी संघटनेत भरती करून घेतली जात आहे. २०२४ नंतर जमात ए इस्लामी सक्रीय आहे. हरकत उल जिहाद इस्लामी बांग्लादेश आणि जमात उल मुजाहिदीन बांगलादेशसारख्या संघटना लश्कराशी जोडल्या आहेत. विद्यापीठात ५ मदरसे चालवले जातात. यातून जिहाद मुलांना शिकवला जातो. 

भारतीयांना बनवलं जात आहे कट्टरपंथी

शिबिरातील सदस्य भारतीय विद्यार्थ्यांना इस्लामी धडे गिरवण्यासाठी आमंत्रित करत आहेत. धार्मिक चर्चेसोबत Let प्रचार व्हिडिओ दाखवले जात आहेत. ढाका महाविद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमांना काश्मिरातील दहशतवाद्यांना शहीद म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. भारतासोबतचे हल्ले फुटेज टेलिग्राम आणि सिग्नल एन्क्रिप्टेड माध्यमातून पसरवले जात आहेत. ज्यात पहलगाम हल्ल्यासारख्या घटनांचे व्हिडिओ भारताविरोधात भावना भडकवण्यासाठी प्रसारित केले जात आहेत. 

दरम्यान, कट्टरपंथी गट आर्थिकदृष्ट्या दुर्बल भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, पूर मदत आणि आर्थिक मदत देतात. २०२४ च्या पुरानंतर, जमातने कट्टरपंथी साहित्यासह मदत वाटली. भारतीय तरुणांना वेगळे करून कट्टरपंथीवादाची ओळख संरक्षणाचा एक प्रकार म्हणून देतात, तर काही समूह निष्ठा निर्माण करण्यासाठी दाढी आणि बुरखा यांसारखे रूढीवादी ड्रेस कोड लागू करतात.

टॅग्स :IndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूरLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदBangladeshबांगलादेश