शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'लेझर गायडेड' रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी : लांब पल्ल्याचे लक्ष्य करता येणार नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 21:06 IST

शत्रुच्या रणगाड्याने जागा बदलली तरी लेझरच्या मदतीने लक्ष्याचा पाठलाग करत त्याला उद्धवस्त करणे आता शक्य होणार आहे...

ठळक मुद्देअहमदनगर येथील केके रेंजवर घेतली चाचणी

पुणे : लेझरच्या मदतीने निश्चित केलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करणाऱ्या रणगाडाभेदी लाम्ब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी गुरुवारी अहमदनगर येथील केके रेंज वर करण्यात आली. अर्जुन रणगाड्यातून ही चाचणी करण्यात आली. डीआरडीओच्या पुण्यातील एआरडीई आणि एचईएमआरएल या प्रयोगशाळांमध्ये या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली.  संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील आरमामेन्ट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इस्टाब्लिशमेंट (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबरेटरी (एचईएमआरएल) या दोन प्रयोगशाळांमध्ये हे क्षेपणास्र विकसित करण्यात आले आहे. क्षेपणास्त्राची रचना, त्यासाठी आवश्‍यक असणारे तंत्रज्ञान विकसित करणे तसेच क्षेपणास्त्र डागण्यासाठी आवश्‍यक असलेली लॉन्चिंग यंत्रणा एआरडीई या संस्थेत निर्माण करण्यात आली आहे. तर या क्षेपणास्त्रात आवश्‍यक असणारा दारूगोळा तसेच विविध तांत्रिक गोष्टींची निर्मिती एचईएमआरएल या प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. नुकतेच कमी अंतरावरील रणगाडा भेदण्यासाठीची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर आता गुरूवारी (दि.1) लांब अंतरावरील शत्रू रणगाडा भेदण्याबाबत यशस्वी चाचणी लष्करातर्फे करण्यात आली. --------------------रणगाडा युद्धात वेगाने आणि अचूक कारवाई करण्यासाठी रणगाडाभेदी क्षेपणास्त्र वापतात. या क्षेपणास्त्रामुळे युद्धात भारतीय रणगाडे जास्त प्रभावी ठरणार आहेत. शत्रुच्या रणगाड्याचा लेझरच्या मदतीने वेध घेऊन क्षेपणास्त्र हल्ला केला जातो. यात शत्रुच्या रणगाड्याने जागा बदलली तरी लेझरच्या मदतीने लक्ष्याचा पाठलाग करत त्याला उद्धवस्त करणे आता शक्य होणार आहे.

...लेझर गायडेड रणगाडाभेदी क्षेपणास्त्राच्या मदतीने दीड किलोमीटर ते ५ किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेता येणार आहे. अर्जुन रणगड्याच्या १२० एमएम तोफेतून हे क्षेपणास्त्र डागता येणार आहे.  हे क्षेपणास्त्र वेगवेगळ्या वाहनांतून लक्ष्यावर हल्ला करण्यासाठी सक्षम आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Armyभारतीय जवानwarयुद्ध