'लप्पू सा सचिन' म्हणणाऱ्या शेजारीणीशी भिडली सीमा हैदर; झाला तुफान राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:20 IST2023-08-18T16:20:17+5:302023-08-18T16:20:47+5:30

महिलेने लप्पू, झिंगूर असे शब्द सचिनबद्दल वापरल्याने वाद विकोपाला

lappu sa sachin jhingur sa ladka seema haider and neighbour mithilesh bhati scuffle tv-show | 'लप्पू सा सचिन' म्हणणाऱ्या शेजारीणीशी भिडली सीमा हैदर; झाला तुफान राडा

'लप्पू सा सचिन' म्हणणाऱ्या शेजारीणीशी भिडली सीमा हैदर; झाला तुफान राडा

Seema Haider Sachin love story: पाकिस्तानची सीमारेषा हैदर बेकायदेशीर पद्धतीने ओलांडून भारतात येणारी सीमा हैदर, तिची प्रेमकहाणी आणि शेजाऱ्यांसोबतची भांडणं हा चर्चेचा विषय ठरत आहे. सीमा हैदरची शेजारीण मिथिलेश भाभी सचिन बद्दल बोलताना, 'लप्पू सा सचिन' असं म्हणाली होती. त्यानंतर आता, सीमाचे वकील एपी सिंह यांनी मिथिलेशला कायदेशीर नोटीस बजावली आहे. झिंगूर आणि लप्पू हे शब्द शेजारणीने टीव्ही चॅनलवर आपल्या पतीविरोधात वापरले असल्याने तिला थेट नोटीस पाठवली आहे.

एका टीव्ही चॅनलशी संभाषण करताना सीमा हैदरने उघडपणे तिचा शेजारी मिथिलेशशी वादविवाद केला आणि स्पष्टपणे सांगितले की ती तिच्या पतीबद्दल असे शब्द ऐकून घेणार नाही. हे प्रकरण इतके वाढले की मिथिलेशनेही तिला पाकिस्तानातून आल्याबद्दल टोमणे मारले आणि दोघेही लाइव्ह शोमध्ये तू-तू-मैं-मैं करू लागले. त्यानंतर आता प्रकरण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.

'सचिन जसा आहे, तसा मला नवरा म्हणून पसंत आहे'

सचिनबाबत केलेल्या वक्तव्यावर सीमा हैदरने आक्षेप घेतला. माझ्या पतीबद्दल चुकीचे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे ती म्हणाली. सचिन जसा आहे, तसा मला नवरा म्हणून पसंत आहे. मिथिलेशला त्याच्याबद्दल चुकीचे बोलण्याचा अधिकार नाही, असे ती म्हणाली. सीमाने प्रश्न विचारला की जेव्हा तिचा नवरा तिला सोडून तीन वर्षांसाठी दुसरीकडे जातो, त्यावेळी तिने आणखी काय करायला हवे होते? यावर मिथिलेश संतापली. 'आमचे सैनिक 10-10 वर्षे सीमेवर राहतात, कुणाच्या भगिनी किंवा मुली  अशाप्रकारे बेकायदेशीर पद्धतीने येत नाहीत', असा टोला तिने लगावला. 'मला मुलगी असती आणि तिने असे केले असते तर मी तिची मान कापून टाकली असती. सीमाने मुलांना पाकिस्तानातच न्यावं,' असे ती म्हणाली.

Web Title: lappu sa sachin jhingur sa ladka seema haider and neighbour mithilesh bhati scuffle tv-show